Saturday, January 28, 2023

६६ हजाराचा मुद्देमाल लंपास; शहरात अजून एक घरफोडी… गुन्हा दाखल…

- Advertisement -

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

दिवसेंदिवस शहरात चोरीचे प्रमाण वाढत जात असल्याचे समोर येत आहे. त्यात भर म्हणून शहरातील निवृत्ती नगरात एका घरातून चोरांनी ६६ हजाराचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घरफोडी बाबत जिल्हापेठ पोलिस स्टेशन मध्ये अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (An incident has come to light that thieves looted goods worth 66,000 from a house in Nivritti Nagar of the city)

- Advertisement -

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, कल्याणे होळ ता. धरणगाव येथील रहिवासी देवेंद्रसिंग चंद्रसिंग जाधव(३६) यांच्या मालकीचे घर शहरातील जळगाव – धुळे महामार्गावर असलेल्या निवृत्ती नगर येथे आहे. दि.२८ रोजी अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करीत घरातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह, रोख रक्कम लंपास केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर जाधव यांनी जिल्हा पेठ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोहेकॉ. मनोज बंकट हे करीत आहेत.

spot_imgspot_img

हे वाचायलाच हवे