भारतातील दख्खनच्या पठारावर असलेल्या ज्वालामुखींमुळे डायनासोर नामशेष

0

वॉशिंग्टन : डायनासोरचे नामशेष होणे ही पृथ्वीवरील सर्वात मोठी आपत्ती मानली जाते. पृथ्वीवरून डायनासोर नष्ट होण्यास उल्कापात कारणीभूत असल्याचे म्हटले जाते. मात्र डायनासोर नामशेष होण्यामागचे खरे कारण उल्कापिंड नसून उल्कापातापूर्वीच भारतातील दख्खन पठारावर झालेल्या ज्वालामुखीचा उद्रेक कारणीभूत असल्याची नवी माहिती पुढे आली आहे. या उद्रेकामुळेच पृथ्वीवरून डायनासोरच्या प्रजाती समूळ नष्ट झाल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. डायनासोरच्या विनाशाचे कारण मानली जाणारी उल्का सुमारे ६६ दशलक्ष वर्षांपूर्वी पृथ्वीवर आदळली होती. पण त्यापूर्वीच पृथ्वीच्या वातावरणात मोठ्या प्रमाणात सल्फर मिसळून डायनासोरचा अंत झाल्याचा दावा आंतरराष्ट्रीय संशोधकांच्या चमूने केला आहे.

ज्वालामुखी लाव्हाच्या प्रवाहातून निर्माण झालेल्या दख्खनच्या पठारावरीलज्वालामुखीचा इतिहास आणि पर्यावरणाचा अभ्यास करण्यासाठी संशोधकांनी येथील खडकांचे परीक्षण केले. त्यात दख्खन भागातून सतत होणारे सल्फर उत्सर्जन जगातील हवामान थंड करण्यासाठी पुरेसे असल्याची माहिती समोर आली आहे. या भागातूनच एक दशलक्ष घन किलोमीटर इतके प्रचंड वितळलेले

खडक बाहेर पडले. त्यामुळे वातावरणात मोठ्या प्रमाणात सल्फर मिसळून अनेक दशकांचा हिवाळा तयार झाला. थोडक्यात हिमयुग अवतरले.

डायनासोर नष्ट झाल्याची शक्यता मॅकगिल विद्यापीठातील भू-रसायनशास्त्रज्ञ डॉन बेकर यांनी व्यक्त केली आहे. डायनासोरच्या विनाशकाळात ज्वालामुखीच्या उद्रेकांमुळे

वातावरणातील सल्फरचे प्रमाण उच्च पातळीवर पोहोचले होते. परंतु विविध संशोधनातून डायनासोरच्या नामशेष होण्यामागे ज्वालामुखीय उद्रेकाचे कारण नाकारण्यात आले होते. आता पुन्हा काही संशोधकांच्या अभ्यासात ज्वालामुखीय उद्रेकांमुळे वातावरणात मोठ्या प्रमाणात सल्फर सोडला गेल्याने जागतिक तापमानात घट होऊन त्याचा प्रभाव डायनासोरच्या अस्तित्वावर झाल्याचे नमूद केले आहे. ओस्लो विद्यापीठाच्या भूवैज्ञानिक सारा कॅलेगारो आणि सहकाऱ्यांनी त्यांच्या पेपरमध्ये याविषयी सविस्तर माहिती देताना ज्वालामुखीतून सोडलेला सल्फर डायऑक्साइड वातावरणात मिसळून वाफेसोबत प्रक्रिया होऊन वातावरणात एरोसोल तयार झाल्याने सूर्यप्रकाश परावर्तित झाल्याने येथील पृथ्वीवरील प्रदीर्घ हिवाळ्यांमुळे डायनासोरचे अस्तित्व नामशेष झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.