शिव महापुराण कथा वाचक पंडित प्रदीप मिश्रा यांचे जळगावात जल्लोषात स्वागत

0

जळगाव :-शहरापासून 8 किलोमीटर अंतरावर वडनगरी फाटा येथे बडे जटाधारी महादेव मंदिर ट्रस्टतर्फे शिवमहापुराण कथा ५ ते ११ डिसेंबर दरम्यान आयोजित करण्यात आली आहे. कथावाचक पंडीत प्रदीप मिश्रा यांचे सोमवारी रात्री ९ वाजता जळगावात आगमन झाले. पुष्पवृष्टी करून भाविकांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. मंगळवारपासून आठवडाभर रोज दुपारी २ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत कथावाचन होईल. कथेच्या निमित्ताने वडनगरी फाटा शिवभक्तांनी फुलून गेल्याचे चित्र दिसून आले. दरम्यान पंडित प्रदीप मिश्रा यांचे रात्री वडनागरीत आगमन झाले असा कानडदा रस्त्यावर महिला पुरुषांसह चिमुकल्यांनी मोठी गर्दी केली होती त्यांचे दर्शन करण्यासाठी एकच गर्दी झाल्याने भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत होते.

शिवमहापुराण कथेनिमित्त कानळदाकडे जाणारी वाहतूक बंद

 

येथील बडे जटाधारी महादेव मंदिर येथे दि. ५ रोजीपासून सात दिवस शिव महापुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे या मार्गावरुन होणारी वाहतुक सात दिवसांसाठी पुर्णपणे बंद करण्यात आली आहे. याठिकाहून जाणाऱ्या नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याच्या सूचना जिल्हा वाहतुक विभागाकडून देण्यात आल्या आहे.

सिहोरवाले पंडीत प्रदिप मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथेला मंगळवार दि. ५ रोजी पासून सुरुवात होत आहे. या कथेसाठी राज्यासह इतर राज्यातील सुमारे सात ते आठ लाख भाविक येणार असल्याचा अंदाज जिल्हा पोलीस दलाकडून वर्तविण्यात आला आहे. त्यानुसार वाहतुकीची संपुर्ण तयारी देखील करण्यात आली आहे. या ठिकाणावरील वाहतुक व्यवस्था सुरळीत राहण्यासाठी कानळदा रोडवरील वाहतुक मार्गात बदल करण्यात आला आहे. त्यामध्ये जळगाव शहरातील मारोती चौक ते खेडी- आव्हाणा फाटा – वडनगरी फाटाकडे जाणारी व त्याठिकाणाहून शहराकडे येणारी वाहतुक दि. ११ रोजी पर्यंत पुर्णपणे बंद करण्यात आली आहे. तसेच याठिकाणाहून होणाऱ्या वाहतुकीसाठी पर्यायी मार्गाचा वापर करावा, याबाबतचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी काढले आहे.

अवजड वाहनांसाठी पर्यायी मार्ग

शहरातून होणाऱ्या अवजड वाहनांसाठी गुजराल पेट्रोलपंप, सुरत रेल्वे गेट, दूध फेडरेशनमार्गे छत्रपती शिवाजी नगर, अमर चौक शिवाजीनगर, ममुराबाद रोडमार्गे, विदगाव, रिधूर, आमोदे खु मार्गे भोकर या पर्यायी मार्गाचा वापर करावा.

मोटार सायकल व कारसाठी पर्यायी मार्ग

मोटार सायकल, कार व हलक्या वाहनांसाठी शहरातून टॉवर चौक, छत्रपती शिवाजी नगरमार्गे अमर चौक, ममुराबाद रोडमार्गे, विदगाव, रिधूर, आमोदा खु. मार्गे भोकर कडे जाणारा तसेच दुसरा मार्ग हा टॉवर चौक, भिलपुरा चौक, ममुराबाद रोडमार्गे, विदगाव, रिधूर, आमोदा खु. मार्गे भोकर या पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन वाहतुक विभागाकडून करण्यात आले आहे.

शिव महापुराण कथेनिमित्त जवळपास 1200 पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला असून वीस बेडचा दवाखाना उभारण्यात आला आहे तसेच जळगाव शहरातून 100 जादा बसेस राज्य परिवहन महामंडळाकडून सोडण्यात येणार असून आठ अग्निशामक बंब तैनात करण्यात आले आहे. तसेच 24 तास रुग्णवाहिका उपलब्ध करण्यात आले आहे.

 

जैन इरिगेशन व जिल्हा दूध संघाकडून पाण्याच्या टँकरची व्यवस्था करण्यात आली असून भाविकांच्या रात्रीच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे

 

Leave A Reply

Your email address will not be published.