नवा दौर, नवी सायकल; धुलिया सायकल मार्टची अनोखी उपलब्धी (व्हिडीओ)

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

आजच्या आधुनिक युगात नवीन संशोधनामुळे अनेक नवीन वाहने उदयास आल्याने सायकल हा प्रकार कालबाह्य झाला. पण म्हणतात न की “जुनं ते सोनं” या उक्तीप्रमाणे आता विज्ञानाने अनेकविध संशोधन करून अत्याधुनिक सायकल तयार केली. कालानुरूप सायकलमध्ये बदल झाल्याने सायकलचे महत्व वाढले आहेत. तसेच लोकांना व्यायामाचे महत्व समजल्याने जिम, मॉर्निंग वॉक व्यायाम आणि सायकलिंग करतात. जसे व्यायामाचे अनेक फायदे आहेत तसेच सायकलिंगचे देखील अनोखे फायदे आहेत. आज आम्ही तुम्हाला सायकलिंगचे अनोखे फायदे एका जाहिरातीच्या माध्यमातून सांगणार आहोत. म्हणून पुढील सविस्तर माहितीसह व्हिडीओ नक्की पहा..

धुलिया सायकल कंपनीचा इतिहास सत्तर वर्षापेक्षा ही जुना आहे. काळानुसार आणि वेळेनुसार त्यांची प्रत्येक नवी पिढी जुन्या रूढी मागे सोडून प्रगती करत जुन्या तंत्रज्ञानाकडून नवीन तंत्रज्ञानाकडे कात टाकत गेली आहे. रूपला शेठ रोकडे यांनी धुळ्याला सुरू केलेली सायकलची ऐतिहासिक चळवळ पुढे सरसावत आता त्यांची चौथी पिढी सुद्धा जोमाने पुढे सरसावत आहेत.

अत्याधुनिक अशा नव्या टेक्नॉलॉजीच्या कार्बन, अल्लॉय, गियर सायकली नुसत्या आणल्याचं नाहीत तर त्या करता अमेरिकन तज्ञांकडून प्रशिक्षित असलेले सर्टीफाईड सर्व्हिस इंजिनीअर्स सुद्धा ठेवले आहेत. अशा विशेष आणि महागड्या सायकल्स कुणीही रिपेअर करू शकत नाहीत. त्याला विशेष असे प्रावीण्य लागते आणि ते धूलिया सायकलने अमेरिकन तज्ञांकडून प्राप्त केले आहे.

प्रगत युरोप आणि अमेरिकन देशातील प्रगत सायकली जळगावात सर्वप्रथम आणण्याचे श्रेय धुलिया सायकलला जाते. कॅनडा देशाची कॅननडेल, कॅलिफोर्नियाची मंगुस, जायांट, पोलीगोन, स्पिंक्स आदी प्रख्यात ब्रँड्सची ओळख त्यांनी जळगांवला करून दिली.

ते फक्त सायकल विकून मोकळे नाही झालेत. ज्या व्यक्तीने सायकल घेतली आहे ती व्यक्ती सायकल रेगुलर चालवत आहे की नाही याची सुद्धा त्यांनी दखल घेतली आहे. जळगावातील आजवरचा सर्वात पहिला सायकलिंग ग्रुप रिसायकल टीम नावाने त्यांनी साधारण १० वर्षापासून सुरू ठेवला आहे, ज्यामुळे बरीच सायकलिस्ट दिग्गज आणि सामान्य रायडर्स एकमेकाशी जुळले गेले आहेत.

बऱ्याच जनजागृती सायकल रॅली ते नेहमीच काढत असतात. रिसायकल टीममुळे बरीच सायकलिंगची चळवळ वाढत चालली आहे. डॉ. विजय घोलप, विशाल आंधळे, प्रो. के. एफ. पवार, प्रो. दीपक दलाल यांसारखे बरेच दिग्गज सायकलिस्ट या ग्रुपमुळे तयार झाले आहेत. फक्त ग्रूपच नव्हे तर खूप सुंदर माणसे सुद्धा या ग्रुपमुळे जोडली गेली आहेत. एक परिवाराप्रमाणे सर्व मिळून मिसळून वेळोवेळी एकमेकाला लागेल तशी मदत करत असतात.

तसे पाहिले तर कोरोनामुळे लोकांचा सायकलिंगकडे कल वाढला. कोरोनामुळे लोकांना बराच मोकळा वेळ मिळाला आणि त्यांना घराबाहेर लॉकडाऊनमध्ये बाहेर पडायचा सायकलिंग एक बहाना मिळाला. मजबुरीत का होईना पण बरीच लोक बाहेर पडता येईल या बहाण्याने सायकल चालवू लागले आणि त्यांना सायकलिंगची खरी किंमत कळाली.

सायकलिंगचे अनोखे फायदे

1. शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुदृढ

सायकलिंगमुळे मांसपेशींना आकार प्राप्त होतो. शरीराचा सर्वात मोठ्या मांसपेशींचा व्यायाम झाल्याने वजन नियंत्रित राहण्यास मदत होते. पचनक्रिया सुधारते, मासपेशींना आकार येतो. चरबीचे प्रमाण कमी होते. सायकलिंगचा शारीरिक आरोग्यासह मानसिक आरोग्यावर उत्तम परिणाम होतो. डिप्रेशन, ताणतणाव आणि चिंता या मानसिक त्रासांपासून दूर व्हायचं असेल, तर सायकल चालवण्याचा पर्याय तुम्ही नक्कीच निवडू शकता.

2. मधुमेहावरील रामबाण उपाय

मधुमेह म्हणजेच डायबेटीस हा आजच्या काळातील अगदी नियमित असा आजार झालेला आहे. याचे मुख्य कारण म्हणजे हालचाल आणि व्यायामाचा अभाव असणे. सायकलिंग हा व्यायाम डायबेटिसवरील चांगला उपाय सुद्धा ठरतो. शास्त्रज्ञांचं असं म्हणणं आहे, की रोज किमान अर्धा तास सायकलिंग केल्यास मधुमेहाचा धोका जवळपास ४० टक्क्यांनी कमी होऊ शकतो.

3. हृदयविकारापासून बचाव

मधुमेहासारखाच हृदयविकाराचे प्रमाण देखील मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. हार्टअटॅक, ब्लड प्रेशर आणि स्ट्रोक यासारखे आजार हृदयावर ताण आल्यामुळे घडू शकतात. हृदय जपणं हे खूप गरजेचं आहे. सायकलिंगमुळे हृदयाचे स्नायू मजबूत होतात, रक्तातील फॅट्स कमी होण्यास मदत होते. याशिवाय श्वासोच्छवासावर उत्तम नियंत्रण मिळवण्यासाठी फायदा होतो. पर्यायाने, हृदय अधिक सुदृढ होण्यास मदत होते.

4. रोगप्रतिकार शक्ती वाढवते

अनेक आजारांपासून बचाव करण्यासाठी आपली रोगप्रतिकारशक्ती चांगली असे आवश्यक आहे. म्हणून व्यायाम आणि वाढणारी रोगप्रतिकारशक्ती हे एक समीकरणच आहे. म्हणून आठवड्यातून किमान ३ ते ५ दिवस सायकलिंग करणं रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी निश्चितपणे उपयोगी ठरेल.

5. संधिवात आणि हाडांचे आजार नाहीसे होतात

सायकलिंगमुळे स्नायू आणि हाडांची ताकद वाढते. अवयवांची सुसूत्रता वाढण्यास मदत होते आणि त्यामुळे शरीर सुदृढ होते. हाडं मजबूत झाल्यामुळे फ्रॅक्चर होण्याची शक्यता कमी होते.म्हणून संधिवातासारख्या आजारांवर सायकलिंग हा उत्तम आणि प्रभावी उपाय ठरू शकतो.

6. कॅन्सरपासून बचाव

की नियमित सायकलिंग केल्यामुळे कॅन्सरचा धोका कमी होऊ शकतो. नियमितपणे सायकलिंग केल्यामुळे ब्रेस्ट कॅन्सरचा धोका कमी होतो. याशिवाय आतड्यांचा कॅन्सरचा धोका कमी करण्यासाठी सुद्धा सायकलिंग करणे फायदेशीर ठरते.

Leave A Reply

Your email address will not be published.