जुन्या भांडणाच्या कारणावरून शेतकऱ्याच्या परिवाराला मारहाण

0

धरणगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क
जुन्या भांडणाच्या कारणावरून एका शेतकऱ्यासह त्यांच्या भावाला यांना बेदम मारहाण करून कुटुंबीयांना अश्लिल शिवीगाळ केल्याची घटना धरणगाव तालुक्यातील पिंपळे सिम गावात घडली ..याबाबत गुरुवार २० एप्रिल रोजी दुपारी १ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात ४ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

संजय लीलाचंद पाटील (वय-४३) रा. पिंपळे सिम ता. धरणगाव हे आई व पत्नी यांच्यासह राहत असून शेती व्यवसाय करतात . बुधवार १९ एप्रिल रोजी सकाळी साडेसात वाजता जुन्या भांडणाच्या कारणावरून गावात राहणारे मणिलाल रूपसिंग पवार, दीपक मणिलाल पवार, दीपक राजाराम पवार, जितेंद्र मनीलाल पवार सर्व रा. पिंपळे सिम ता. धरणगाव यांनी संजय पाटील यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली तर एकाने लाकडी दांड्याने वार करून दुखापत केली. भांडण सुरू असताना संजय पाटील यांचा भाऊ ज्ञानेश्वर पाटील हा मध्यस्थी करण्यासाठी आला असता त्याला देखील बेदम मारहाण केली. तसेच संजय पाटील यांची पत्नी आणि आई यांना अश्लिल शिवीगाळ केली. हा प्रकार घडल्यानंतर संजय पाटील यांनी धरणगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गुरुवार २० एप्रिल रोजी ४ जणांविरोधात धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र कोळी करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.