मुंबई ;– बॉलिवूड अभिनेता सनी देओलचा मुलगा करण देओल आणि द्रिशा नुकतेच विवाह बंधनात अडकले. करण देओल आणि द्रिशा आचार्य यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
#Dharmendra Ji is the cutest as he dances his heart out at #KaranDeol wedding ❤️@aapkadharam #SunnyDeol #BobbyDeol #KaranDeol #BollywoodBubble pic.twitter.com/KU80ChFcp3
— Bollywood Bubble (@bollybubble) June 18, 2023
काही व्हिडीओंमध्ये सनी देओल, धर्मेंद्र आणि बॉबी देओल हे देखील दिसत आहेत. दोघेही लग्नमंडपात बसलेले दिसत आहेत. यादरम्यान दिशा लाल लेहेंग्यात खूपच सुंदर दिसत आहे. दृशा ही गतकाळातील प्रसिद्ध दिग्दर्शक बिमल रॉय यांची नात आहे. दोघेही एकमेकांना लहानपणापासून ओळखतात.
धर्मेंद्र आपल्या नातवाच्या लग्नाच्या वरातीत नाचताना दिसले. यावेळी ते ब्राऊन कलरच्या सूटमध्ये दिसले.
मिरवणुकीचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सुपरस्टार धर्मेंद्र, अभिनेता सनी देओल आणि बॉबी देओल व्हिडिओमध्ये एकत्र दिसले.
दुसऱ्या व्हिडीओमध्ये नवरदेव करणची झलकही पाहायला मिळाली. करण घोडीवर स्वार होऊन लग्नस्थळी पोहोचला. दरम्यान, करण क्रीम शेरवानी आणि मॅचिंग पगडीमध्ये दिसला.