लातूर, लोकशाही न्यूज नेटवर्क
प्रेम प्रकरणातून जबर मारहाण झाल्यामुळे अखेर तरुणाचा दुर्दवी अंत झाला आहे. क्रूरपणे त्यांची हत्या करण्यात आली. नाकातोंडात मिरची पावडर टाकून मारहाण करण्यात आली. पंधरा दिवस तरुणावर रुग्णालयात उपचार सुरु असतांना त्याची मृत्यूशी झुंज अखेर संपली. काल रात्री तरुणाचा उपचारादम्यान मृत्यू झाला. लातूर जिल्ह्यातील भादा या गातील हि घटना आहे.
लातूर जिल्ह्यातील २० वर्षीय तरुण बळीराम नेताजी मगर याचा शनिवारी रात्री दुर्दैवी मृत्यू झाला. बळीरामचे गावातील एका तरुणीवर प्रेम होते. याची खबर तिच्या घरच्यांना लागली. बळीरामला जाब विचारण्यासाठी त्याला घरी बोलवण्यात आले. व भादा गावाच्या शिवारात त्याला अमानुषपणे मारहाण करण्यात आली. मारहाण करतेसमयी त्याच्या नाकात व तोंडात मिरची पूड टाकण्यात आली. त्याला प्रचंड मारहाण झाल्यामुळे त्याच्या नातेवाइकांनी भादा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी तत्काळ याप्रकरणातील पाच आरोपींना अटक केली आहे. यामध्ये तीन पुरुष व दोन महिलांचा समावेश आहे.
गावात तणावाचे वातावरण
मारहाण झाल्यामुळे बळीराम मगर यास लातूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र छातीत मोठ्या प्रमाणात मिरची पावडर गेली होती. तसेच डोळ्यांना ही खूप इजा झाली होती. मागील 15 दिवसापासून बळीराम वर उपचार सुरू होते व उपचारादरम्यान त्याचा काल रात्री मृत्यू झाला. बळीरामचा मृत्यू झाल्याची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरल्याने गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले.