शरद पवार यांना रोहिणी खडसेंनी दिले स्वतः छायाचित्रित केलेली फ्लेमिंगो पक्षांचे फोटो

0

मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा चे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar) हे आज जळगाव जिल्हा दौऱ्यावर आले असतांना त्यांनी अमळनेर येथील ग्रंथालय सेलचे अधिवेशन आटोपून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष रविंद्र पाटील यांच्या निवासस्थानी भेट दिली. या ठिकाणी शरद पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांनी फ्लेमिंगो पक्षाचे प्रतिमा असलेल्या फोटो फ्रेम भेट दिली. हे फोटो स्वतः रोहिणी खडसे यांनी छायाचित्रीत केलेली आहेत. बारामती पासून जवळ असलेल्या भिगवण परिसरात उजनी धरणाच्या बॅक वॉटर मध्ये हिवाळ्यात दरवर्षी परदेशी फ्लेमिंगो पक्षी स्थलांतरित होत असतात. रोहिणी खडसे यांनी गेल्या वर्षी या ठिकाणी भेट देऊन फ्लेमिंगो पक्षांची फोटोग्राफी केली होती त्यातील निवडक फोटोंची फ्रेम बनवून रोहिणी खडसे यांनी ते शरद पवार यांना भेट दिले.

हा पक्षी आकाशात उडत असताना अग्नीसारखा रंग दिसतो. म्हणून त्याला अग्निपंख सुद्धा म्हटले जाते. भीमेच्या काठावर निसर्गाचा अपूर्व मेळ, पक्षांच्या मंजुळ मंगलमय किलबिलाट येथे अनुभवायला मिळतो. हे अविस्मरणीय आनंदाचे क्षण यावेळी तुषार मानकर याच्या मार्गदर्शना खाली फोटोंच्या रुपाने कॅमेरा मध्ये कैद केले होते. या फोटोंची फ्रेम बनवून आज शरद पवार यांना भेट देताना आनंद होत असल्याचे रोहिणी खडसे म्हणाल्या

Leave A Reply

Your email address will not be published.