बिग बॉसचा वाढला पारा, पहिल्याच दिवशी ‘या’ स्पर्धकाला दाखवला बाहेरचा रस्ता

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

अभिनेता सलमान खान (Salman Khan) यंदा ‘बिग बॉस ओटीटी’ (Bigg Boss OTT) चा हा सीजन २ होस्ट करत आहे. त्यामुळे त्याच ओटीटीवर सुद्धा पदार्पण झाले आहे. बिग बॉस ओटीटीचे ग्रँड प्रिमिअर मुक्तच पार पडलं. सर्वांचा परिचय सलमानने दिला. आणि ते कधीच बिग बॉस च्या घरात गाडले नसावे असे काही घडले आहे. एका स्पर्धकाने घरात एन्ट्री घेतली. आणि तासातच त्याला घराबाहेरचा रस्ता दाखविण्यात आला आहे. हा स्टार कोण तर, इन्फ्लुएन्सर पुनीत सुपरस्टार (Influencer Puneet Superstar) त्याच्या वर्तवणुकीमुळे वाढला बिग बॉसचा पारा

बिग बॉसचा पारा चढला

पुनीत हा आपल्या वर्तवणुकीमुळे बिग बॉस च्या निशाण्यावर आला आहे. घरातील प्रॉपर्टीला ठेच पोहचविण्याचे काम त्याने केले असून, बाथरूमधील दोन फॅमिली पॅक टूथपेस्ट त्याने आल्याचं चेहऱ्याला लावून खराब केल्याचे दिसत आहे. त्याचेसारही रोज तो असं करत असल्याचा दावा त्याने केला आहे. एवढ्यावरच न थांबता तो म्हणतो “बिग बॉस शी मला काही घेणं देणं नाही. मी शो ला टीआरपी देत आहे. बिगबॉसने त्याला इशारा दिला आणि घरातील संपत्तीला नुकसान केल्याबाबत फटकारले. जर अशीच वर्तवणूक राहिली तर एलिमिनेट केलं जाईल अशी ताकीदही दिली. मात्र याचा पुनीतवर काहीच परिणाम झाला नाही. तो म्हणाला, ‘तुम्हाला मला घरात ठेवायचं तर ठेवा नाही तर नका ठेवू. टीआरपी तुम्हाला मिळत आहे मला नाही.’

बिग बॉसने सर्व सदस्यांना एकत्र बोलावत पुनीत ला बाहेर काढण्यासाठी कोण कोण समर्थन देतंय असं विचारलं. यावर जास्त सदस्यांनी समर्थनार्थ मत दिलं. यामुळेच काही तासातच पुनीत सुपरस्टार घराबाहेर पडला.

Leave A Reply

Your email address will not be published.