50 व्या धरणगाव तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात जीपीएस स्कूलचा डंका

0

धरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

दि, 20 जानेवारी 2023 रोजी ‘लिटल ब्लॉसम स्कूल धरणगाव’ येथे झालेल्या 50 व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात पाळधी येथील भाऊसाहेब गुलाबरावजी पाटील इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. शिक्षण विभाग पंचायत समिती धरणगाव व लिटल ब्लॉजम स्कूल धरणगाव (Dharangaon) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या विज्ञान प्रदर्शनामध्ये भाऊसाहेब गुलाबरावजी पाटील इंग्लिश मीडियम स्कूल, इयत्ता सहावीचे विद्यार्थी. रेहान खान व नितीन नाथ या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या थ्रीडी होलोग्रम या उपकरणाला द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले. ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये डिजिटल शिक्षणाची क्रांती थ्रीडी होलोग्राम या संकल्पनेतून येऊ शकते या तत्त्वावर सदर उपक्रम सादर करण्यात आले. विद्यार्थ्यांना शाळेतील शिक्षक योगेश्वर शिंदे यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.

विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे आधारस्तंभ माननीय नामदार गुलाबराव पाटील (Gulabrao Patil), संस्थेचे अध्यक्ष प्रतापराव पाटील (Prataprao Patil) व विक्रम पाटील (Vikram Patil), तसेच भाऊसाहेब गुलाबरावजी पाटील इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य सचिन पाटील यांनी विद्यार्थ्यांचे व संपूर्ण शाळेच्या टीमचे कौतुक केले व जिल्हास्तरीय प्रदर्शनासाठी शुभेच्छा दिल्या.
जय जवान, जय किसान आणि जय विज्ञान ही 21 व्या शतकातील समाज उन्नतीची त्रिसूत्री आहे. असे प्रतिपादन प्रतापरावजी पाटील यांनी यावेळी केले. शिक्षण क्षेत्रात सर्वोत्कृष्टतेचा ध्यास घेऊन विद्यार्थी विकासासाठी आम्ही नेहमीच तत्पर राहू असे आश्वासन प्राचार्य सचिन पाटील यांनी सर्व उपस्थितांना दिले.

Leave A Reply

Your email address will not be published.