अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना मिळणार मोफत धान्य

0

लोकशाही न्यूज नेटवर्क
केंद्र शासनाने जानेवारी २०२३ पासून अन्न सुरक्षा कायद्याखाली दिले जाणारे धान्य मोफत देण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार १ जानेवारी २०२३ पासून अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत अंतोदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेमध्ये दिले जाणारे धान्य वर्षापर्यंत मोफत दिले जाईल.हे धान्य याआधी लाभार्थ्यांना २ ते ३ किलो या दराने दिले जात होते.

धान्य देताना त्याची स्वतंत्र पावती दिली जाईल. या धान्याची उचल करताना लाभार्थ्याचे स्वतंत्र बायोमेट्रिक प्रमाणीकरण (इ-पॉस मशीनवर वेगळ्याने अंगठा देणे) करावे लागेल.सर्व लाभार्थ्यांना यापूढे अमळनेर तालुक्यातील लाभार्थ्यांना वर्षभर उपरोक्त धान्याचे पैसे द्यावे लागणार नसल्याचे पत्रक तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांनी काढले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.