गरुड महाविद्यालयात विद्यापीठाच्या नवनियुक्त अधिसभा व अभ्यासमंडळ सदस्यांचा सत्कार

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

येथील अप्पासाहेब र.भा.गरुड कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, येथे विद्यापीठाच्या चअधिसभा व अभ्यास मंडळावर नव्याने सदस्यपदी निवड झाल्या बद्दल संस्थाचालक गटातून पाचोरा तालुका एज्युकेशन सोसायटीचे व्ही टी जोशी आणि प्राचार्य गटातून गरुड महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही . आर पाटील यासह अभ्यासमंडळ सदस्य प्रा वासुदेव वले (पाचोरा), प्रा प्रशांत देशमुख आणि डॉ योगिता चौधरी यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून संस्थेचे चेअरमन संजयगरुड तर प्रमुख अतिथी म्हणून सचिवसतीश चंद्र काशिद, संचालिका उज्वलाताई काशिद, संचालक सागरमल जैन, महाविद्यालय विकास समिती सदस्य उत्तम थोरात, आदी उपस्थित होते, कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवराच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले .

याप्रसंगी डॉ. भूषण काटे यांनी आमचे साहेब या कवितेचे सादरीकरण केले. आ ग र गरुड कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य एस पी उदार ,ए. बी. ठोके तसेच पर्यवेक्षक व्ही व्ही पाटील यांनी तर राणी लक्ष्मीबाई पतसंस्था शेंदुर्णीच्या वतीने तज्ञ संचालक उत्तम थोरात व वामन फासे व उमाकांत भगत यांनी प्राचार्य आणि प्राध्यापक यांचा सन्मान करण्यात आला. तसेच राज्यस्तरीय अविष्कार स्पर्धेत निवड : शिवराज बारी , राहूल पाटील , रंजना कुमावत यांची निवड झाली त्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. त्यांनी आविष्कार स्पर्धेत सादर केलेल्या उपकरणांची / संशोधनांची माहिती दिली. जेष्ठ नागरीकांसाठी ११ गॅझेट असणारी काठी वैशिष्ट्यपूर्ण ठरली .
सचिव सतिष चंद्र काशिद सागरमल जैन, उत्तम थोरात, आणि सत्कारमूर्ती व्ही टी जोशी आणि प्राचार्य डॉ व्ही आर पाटील यांनी मनोगत व्यक्त केले तर अध्यक्ष संजय गरुड यांनी व्यक्त केले.

याप्रसंगी संस्थेच्या संचालिका सौ उज्वलाताई काशिद, पाचोरा महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ बी एन पाटील,उपप्राचार्य डॉ संजय भोळे, महाविद्यालयातील शिक्षक व प्रशासकीय कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ .शाम साळुंखे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ . दिनेश पाटील तर आभार डॉ आजिनाथ जिवरग यांनी मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.