महाराणा प्रताप विद्याललयात 30 विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप

0

लोकशाही न्युज नेटवर्क
पारोळा तालुक्यातील महाराणा प्रताप विद्यालय बोळे जिल्हा परिषद शाळेत राष्ट्रीय युवा सप्ताहाच्या निमित्ताने सायकल बँक उपक्रम राबवून 30 विद्यार्थ्यांना सायकलीचे वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक आर. यू. मोरे व प्रमुख पाहुणे म्हणून डाॅ.जितेंद्र नारायण गिरासे तर उदघाटक प्रवीण महाजन ,केंद्रप्रमुख संजय चव्हाण आदी उपस्थित होते. मान्यवरांच्याहस्ते सरस्वतीचे प्रतिमा पूजन करून स्वागत गीताने कार्यक्रमची सुरुवात करण्यात आली.

प्रास्ताविक एस व्ही देवरे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एम आर पाटील आभार जी व्ही जाधव यांनी मानले . यशस्वीतेसाठी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. याप्रसंगी विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.