डेराबर्डी येथे निवासी शाळेत जिल्हास्तरीय कला, क्रीडा अविष्कार स्पर्धा उत्साहात

0

लोकशाही न्युज नेटवर्क

डेराबर्डी येथे कार्यरत आय.एस.ओ. मानांकीत समाजकल्याण विभागाची अनुसुचित जाती व नवबौध्द मुलांची शासकीय निवासी शाळेत सहाय्यक आयुक्त योगेश पाटील यांच्या प्रेरणेतुन मुख्याध्यापक ज्ञानेश्वर सावळे यांच्या मार्गदर्शनाने जिल्हास्तरीय कला, क्रीडा अविष्कार स्पर्धा उत्साहात पार पडल्या.

यास्पर्धा अविष्कारांतर्गत १०० मीटर, २००मीटर, ४००मीटर व रिले धावणे तसेच खो – खो, रस्सीखेच, लांब उडी, थाळी फेक या क्रीडा तसेच कला अविष्कारातील भूमिका अभिनय व लोकनृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी कला स्पर्धेसाठी अभिनय व नृत्यातुन विविध सामाजिक संदेशाचे अफलातुन सादरिकरण केले.

सहाय्यक शिक्षिका वनिता बेरड, रुपाली सोनवणे, सोनाली महाजन यांचे तर क्रीडा स्पर्धेसाठी सहाय्यक शिक्षक दिलीप परदेशी, ध्रुवास राठोड यांचे मार्गदर्शन लाभले. राहुरी जि. अहमदनगर येथे होणाऱ्या विभागस्तरीय स्पर्धेच्या यशाकरीता समाजकल्याण विभागाचे तालुका समन्वयक अनिल पगारे यांचे सहकार्य लाभत आहे.

तसेच या स्पर्धा यशस्वितेकरीता शिक्षक महेंद्र कुमावत, ग्रंथपाल संजय सोनवणे, संभाजी पाटील, ज्ञानेश्वर लिंगायत यांचे सहकार्य लाभले. या स्पर्धेत यश मिळवुन नाशिक विभागस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांचे जळगांव समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश पाटील मुख्याध्यापक ज्ञानेश्वर सावळे तसेच शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी वृंदाकडुन कौतुक करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.