ब्रेकिंग; प्रतिभाताई पाटील यांचे पती देवीसिंग शेखावत यांचे निधन

0

लोकशाही, न्यूज नेटवर्क

माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे पती व अमरावतीचे माजी आमदार देवीसिंग शेखावत यांचे वृद्धापकाळाने निधन. पुणे येथील निवासस्थानी होणार अंतिम संस्कार. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे पती देवीसिंह शेखावत (वय 89) यांचे आज (शुक्रवार) पुण्यात निधन झाले.दोन दिवसांपूर्वी त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना पुण्यातील केईएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. आज सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. आज सायंकाळी 6 वाजता त्यांच्या पार्थिवावर पुण्यात अंत्यसंस्कार होणार आहेत.त्यांच्या मागे पत्नी प्रतिभा पाटील आणि एक मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. देविसिंह शेखावत यांच्या निधनावर राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातून हळहळ व्यक्त होत आहेत.

सामाजिक कार्यात सक्रिय

देविसिंह रणसिंह शेखावत हे माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांचे पती आहेत. ते स्वत: राजकारणात सक्रिय होते. त्यांनी आमदार म्हणूनही काम पाहिलं आहे. देवीसिंह शेखावत यांचा 7 जुलै 1965 रोजी प्रतिभा पाटील यांच्यासोबत विवाह झाला होता. विवाहाच्यावेळी देवीसिंह शेखावत हे अमरावतीचे महापौर होते. अमरावतीतील सामाजिक कार्यात ते सक्रिय होते.

लेक्चरर ते आमदार

सुरुवातीच्या काळात देवीसिंह शेखावत यांनी रसायन शास्त्राचे प्राध्यापाक म्हणून काम पाहिलं होतं. 1972मध्ये मुंबई विद्यापीठाने त्यांना पीएचडी दिली होती. विद्या भारती शिक्षण संस्था या त्यांच्या संस्थेचे ही ते काम पाहत होते. त्यांच्या राजकारणाची सुरुवात काँग्रेसमधून झाली. अमरावतीचे महापौर ते आमदार आदी पदे त्यांनी भूषविली आहेत. मात्र, 1995च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना मोठा पराभव पत्करावा लागला होता. या निवडणुकीत त्यांचं डिपॉझिट जप्त झालं होतं.

Leave A Reply

Your email address will not be published.