ब्रेकिंग; दिल्लीतील AIIMS रुग्णालयाला भीषण आग

0

दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क

दिल्लीतील एम्स रुग्णालयाला (AIIMS Hospital) भीषण आग लागल्याचे समोर येत आहे. अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असहेत. पीटीआयने ट्विट करत या संदर्भात माहिती दिली आहे. पीटीआयने ट्विटमध्ये म्हंटल आहे की , ‘दिल्लीतील एम्स रुग्णालयाच्या इमारतीला आग लागली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीतील एम्सच्या एंडोस्कोपी कक्षात आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दिल्ली अग्निशमन दलाचा आठ गाड्या घटनास्थळी पोहचून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करीत आहे.

आपत्कालीन वॉर्डजवळ भीषण आग

दिल्लीच्या एम्सच्या आपत्कालीन वार्डजवळ भीषण आग लागली आहे. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ८ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात करण्याचा प्रयत्न सुरु आहे. सुमारे ही आग ११.५४ च्या सुमारास लागल्याची माहिती समोर येत आहे.

या रुग्णालयात देशभरातील रुग्ण उपचारासाठी येत असतात. यासोबतच येथे विदेशातूनही रुग्ण उपचारासाठी येत असतात. दिल्लीतील एम्स रुग्णालयात दररोज १२ हजार रुग्ण उपचार घेत असतात.

Leave A Reply

Your email address will not be published.