Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • विधान परिषदेच्या 17 जागांचा बिगुल वाजला!
    • एक दिवसाच्या उपचारासाठी उकळले ३ लाखांचे बील
    • शिवराज मोटेगांवकरांना सीबीआयकडून अटक
    • व्ही. डी. सतीशन यांनी घेतली केरळच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ
    • पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरलाच पाहिजे; अन्यथा भविष्यात संघर्ष अटळ!
    • रावेरला 18 दिव्यांग जोडप्यांचा सामूहिक विवाह उत्साहात
    • नीट पेपरफुटी प्रकरणामागे सर्व भाजपचेच नेते
    • नीट पेपर फुटी प्रकरणात पेपर सेटर्सनीच केला घात!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»बाजारात खाद्य तेलांच्या किमतींमध्ये घट ; सर्वसामान्यांना दिलासा
    महाराष्ट्र

    बाजारात खाद्य तेलांच्या किमतींमध्ये घट ; सर्वसामान्यांना दिलासा

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJanuary 10, 2023Updated:January 10, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    सध्या बाजारात खाद्यतेलाची आवक मुबलक झाल्याने खाद्यतेलाच्या कंमती उतरल्या आहेत. यामुळे गृहिणींना मोठा दिल्ली तेल-तेलबिया बाजारात खाद्यतेलाच्या किमतींचा कल सामान्य राहिला आहे. सोयाबीन बियाणे वगळता मोहरी आणि सोयाबीन तेल-तेलबिया आणि क्रूड पामतेल (सीपीओ) चे भाव खाली आले आहेत. कच्च्या तेलाच्या किमती घसरल्याने सर्वसामान्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. एप्रिल, मे, जून 2022 मध्ये विदेशी तेलाच्या किमती जास्त होत्या. मोहरीचे तेल रिफाइंड असूनही परदेशातून येणाऱ्या तेलाच्या तुलनेत या तेलांची किंमत किलोमागे 20 रुपयांनी कमी आहे. जून, जुलैमध्ये विदेशात तेलाच्या किमतीत काहीशी घसरण झाली. विदेशी तेल स्वस्त झाल्यामुळे देशी मोहरीच्या तेलाचा वापर कमी होत आहे. त्यामुळेच मोहरीच्या तेलात घट झाली आहे. सोयाबीनचीही स्थिती अशीच आहे.

    बाजारातील सूत्रांनी सांगितले की, स्वस्त आयात केलेल्या तेलाची मुबलक उपलब्धता देशांतर्गत मोहरी आणि सोयाबीनच्या किमतीवर दबाव आणत आहे.
    विदेशी बाजारातील वाढत्या कलांमुळे दिल्ली तेल-तेलबिया बाजारात कच्च्या पाम तेल आणि पामोलिन तेलाच्या किमती सोमवारी वाढल्या.

    गतवर्षी केवळ एक लाख टन मोहरीचा साठा शिल्लक होता. यंदा बाहेरून स्वस्त तेल भारतात येत आहे, तर भारतात उत्पादित होणारे मोहरीचे तेल एमएसपीनुसार 20 ते 30 रुपयांनी महागणार आहे. बाहेरून येणाऱ्या स्वस्त तेलासमोर देशांतर्गत मोहरीच्या तेलाच्या विक्रीचे संकट उभे राहणार आहे. बाहेरून येणारे तेल स्वस्त राहिल्यास देशात उत्पादित होणारे तेल वापरता येणार नाही, असे सांगण्यात आले आहे. आगामी काळात देशात 60 ते 70 लाख टन मोहरीचा साठा शिल्लक राहू शकतो.

    #moharioil #palmoil #soyabeenoil
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    विधान परिषदेच्या 17 जागांचा बिगुल वाजला!

    May 18, 2026

    व्ही. डी. सतीशन यांनी घेतली केरळच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ

    May 18, 2026

    पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरलाच पाहिजे; अन्यथा भविष्यात संघर्ष अटळ!

    May 18, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif