उकळते पाणी अंगावर पडल्याने सात वर्षीय चिमुकलीचा मृत्यू…

0

 

छ. संभाजीनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

गुढीपाडव्याच्या दिवशी जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यात एक दुर्दैवी घटनेत उकळलेले पाणी अंगावर पडून जखमी झालेली होती त्या चिमुकलीची उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली (Death during treatment) आहे. तिच्यावर छत्रपती संभाजीनगर शासकीय घाटी रुग्णालयात उपचार सुरु होते. दरम्यान घाटीत उपचारादरम्यान रविवारी (2 एप्रिल) दुपारी दोन वाजता तिचा मृत्यू झाला. प्रतिभा सुभाष खंडागळे (7) वर्षे, पुरी, गंगापूर असे मृत मुलीचे नाव आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुढीपाडव्याच्या दिवशी बुधवारी (22 मार्च) रोजी प्रतिभा घरात झोपलेली होती. याचवेळी तिची आई शेगडीवर तापलेले गरम पाणी खाली घेत असतानाच, कडक पाणी तिच्या अंगावर पडले. अंगावर गरम पाणी पडल्याने प्रतिभा गंभीर जखमी झाली होती. त्यामुळे तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान जखमी प्रतिभावर उपचार करुन सुट्टी देण्यात आली होती. मात्र तिला पुन्हा त्रास सुरु झाल्याने शनिवारी घाटीत दाखल करण्यात आले होते. परंतु रविवारी दुपारी दोन वाजता उपचारादरम्यान तिची प्राणज्योत मालवली. याप्रकरणी गंगापूर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.