धक्कादायक; सिक्कीम-नाथुला सीमेवर हिमस्खलन… सात पर्यटकांचा मृत्यू…

0

 

गुवाहाटी, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

सिक्कीमच्या नाथुला पर्वतीय खिंडीत आज झालेल्या हिमस्खलनात सात पर्यटकांचा मृत्यू झाला असून 11 जण जखमी झाले आहेत. हिमस्खलनानंतर अनेक पर्यटक बर्फात अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. बचावकार्य सुरू आहे. हिमस्खलनादरम्यान 150 हून अधिक पर्यटक या परिसरात असल्याची माहिती मिळाली आहे. सिक्कीम-नाथुला सीमेवर झालेल्या हिमस्खलनात सात पर्यटकांचा मृत्यू झाला असून 11 जण जखमी झाले आहेत.

गंगटोक ते नाथुला जोडणाऱ्या जवाहरलाल नेहरू रोडवर १५व्या मैलावर झालेल्या हिमस्खलनात सात पर्यटकांचा मृत्यू झाला, तर ८० हून अधिक लोक बर्फाखाली अडकल्याची भीती लष्कराच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. मंगळवारी सकाळी 11.30 च्या सुमारास हिमस्खलन झाले. यात जखमी झालेल्या सात जणांचा जवळच्या लष्करी रुग्णालयात मृत्यू झाला. यामध्ये चार पुरुष, एक महिला आणि एका मुलाचा समावेश आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 150 हून अधिक पर्यटक अजूनही 15 मैलांच्या पुढे अडकून पडले आहेत. दरम्यान, बर्फात अडकलेल्या 30 पर्यटकांना वाचवण्यात आले असून त्यांना गंगटोक येथील एसटीएनएम हॉस्पिटल आणि सेंट्रल रेफरल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी सिक्कीम पोलीस, सिक्कीमचे ट्रॅव्हल एजंट असोसिएशन, पर्यटन विभागाचे अधिकारी आणि चालकांकडून बचावकार्य सुरू आहे.

चेकपोस्टचे महानिरीक्षक सोनम तेनसिंग भुटीया यांनी शेअर केलेल्या माहितीनुसार, “पास फक्त 13व्या मैलासाठी जारी केले जातात, परंतु पर्यटक परवानगीशिवाय 15व्या मैलाच्या दिशेने गेले. ही घटना 15व्या मैलावर घडली.”

नाथुला खिंड हे चीनच्या सीमेवर वसलेले आहे आणि त्याच्या मनमोहक सौंदर्यामुळे ते पर्यटकांच्या आकर्षणाचे प्रमुख केंद्र आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.