अष्टपैलू लेखक सय्यद गुलरेज यांचं दुःखद निधन

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

हिंदी सिनेसृष्टीतून आणखी एक दुःखद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध कादंबरीकार आदिल रशीद यांचा मुलगा आणि अष्टपैलू लेखक सय्यद गुलरेज यांचं निधन झालं आहे. सय्यद गुलरेज यांचे 4 नोव्हेंबर रोजी म्हणजे रविवारी निधन झाले. त्यांनी लॉस एंजेलिस येथील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने हिंदी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

सय्यद गुलरेज यांनी अनेक दिग्गज संगीतकारांसोबत काम केलं आहे. त्यांनी नुसरत फतेह अली खान, बप्पी लहिरी, नौशाद अली, विजू शाह, अनु मलिक, अभिषेक रे, गौरव दासगुप्ता यासारख्या संगीतकारांसोबत काम केले. व्हीनस आणि इतर आंतरराष्ट्रीय कंपन्यांसाठी त्यांनी अनेक अल्बम तयार केले.

एक गीतकार म्हणून त्यांनी जगमोहन त्यांनी मुंद्रा यांच्या ‘कमला’ या चित्रपटातून सुरुवात केली होती. या चित्रपटाला संगीतबद्ध बप्पी लहरी यांनी केले होते. तर सलमा, आगा आणि पंकज उधास यांनी या चित्रपटासाठी गाणी लिहिली होती. ‘विषकन्या’, ‘जनम कुंडली’, ‘आ देखो जरा’, ‘आलू चाट’, ‘विजय’, ‘अपार्टमेंट’ हे त्यांचे चित्रपट आहेत. ‘कुछ दिल से’ हा त्यांचा काव्यसंग्रह आहे.

चित्रपट दिग्दर्शक राजेश राठी यांनी गुलरेज यांच्या निधनावर शोक व्यक्त केलाय. त्यांनी सांगितले की, ‘जगमोहन मुंद्रा यांचे सहाय्यक म्हणून ‘कमला’ चित्रपटातून करिअरची सुरुवात करणारे ते उस्फुर्त गीतकार आहेत. संगीत सुरु असताना, बप्पीदांसोबत गुलरेज मला बाहेर घेऊन जायचा. सिगारेट ओढायचा आणि संगीत संपेपर्यंत त्यांचे बोल तयार व्हायचे. तो नेहमीच माझा एक बाउंसिंग बोर्ड म्हणून वापर करत असे. त्यांची गाणी नेहमीच आकर्षक आणि अर्थपूर्ण असायची आणि त्यांना विनोदाची उत्तम जाण होती. आज आपण एक अतिशय प्रतिभावान लोक गमावला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.