मोठी बातमी; बागेश्वर बाबांच्या कार्यक्रमामुळे संभाजीनगर मध्ये प्रचंड वाहतूक कोंडी

0

संभाजीनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क

शहरात अचानक वाहतूक कोंडी झाली असून, जालना रोडच्या दक्षिणेकडील भागातील सर्वच रस्त्यांवर गाड्या ट्राफिकमध्ये अडकल्या आहेत. शहरातील मुख्य मार्ग असलेल्या जालना रोड पूर्णपणे ‘ब्लॉक’ झाला असल्याचे चित्र आहे. शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात बागेश्वर धाम बाबा उर्फ पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री महाराज यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यामुळे काही मार्ग बंद ठेवण्यात आले आहे. मात्र, याचा मोठा फटका शहरवासियांना बसतांना पाहायला मिळत आहे.

बागेश्वर धाम बाबा उर्फ पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री महाराज यांच्या श्री राम, श्री हनुमान कथेला आजपासून रेल्वेस्टेशन येथील अयोध्याननगरी मैदानावर सुरुवात होत आहे. रविवारी रात्री आठ वाजता महाराजांचे विमानतळावर आगमन झाले. दरम्यान, आजपासून तीन दिवस बाबांचा दरबार भरणार आहे. त्यामुळे पोलिसांनी काही मार्ग बंद ठेवण्याचे आदेश काढले. मात्र, यामुळे शहरातील एक भाग पूर्णपणे ब्लॉक झाला आहे. बीड बायपासकडून शहरात येणाऱ्या लोकांचे प्रचंड हाल होत असून, रस्त्यांवर प्रचंड वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. शहरातील क्रांती चौक, बाबा पेट्रोल पंप, नगर नाका, रेल्वे स्टेशन परिसरात ट्राफिक जाम झाली आहे.

अनेक ठिकाणी तासभर नागरिक वाहतूक कोंडीत अडकले आहे. विशेष म्हणजे आठवड्याचा पहिलाच दिवस असल्याने नागरिक अनेक कामानिमित्ताने घराबाहेर पडतात, मात्र त्यांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.