मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा मोठा निर्णय, वाचा सविस्तर

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

दिल्लीत वाढलेल्या प्रदूषणामुळे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सरकारने मोठे निर्णय घेतले आहे. त्यानुसार बांधकामांना बंदी, शाळांना सुट्टी, रस्त्यावर सम-विषम प्रमाणे वाहनांना परवानगी अशा मोठ्या निर्णयांचा समावेश आहे. येत्या १३ ते २० नोव्हेंबरपर्यंत ऑड-इव्हन अर्थात सम विषम नियम लागू होईल याशिवाय कोणत्याही बांधकामांना परवानगी नाही. तसंच ११ वी पर्यंतच्या शाळांना १० नोव्हेंबरपर्यंत सुट्टी असेल. इतकाच नाही BS-३ पेट्रोल आणि BS-४ डिझेल कारवर पूर्णपणे बंदी असेल.

५० टक्के कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम
दिल्लीमध्ये वायू प्रदूषणाचा नवा रेकॉर्ड बनला आहे. प्रदूषणामुळे दिल्लीचे नागरिक त्रस्त झाले आहे. काही केल्या वाढत्या प्रदूषणापासून सुटका मिळताच दिसत नाही. सरकारही सर्व प्रकारचे प्रयत्न करतांना दिसत आहे. मात्र प्रदूषणाची पातळी कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढत आहे. आता दिल्ली सरकारने अनेक मोठी पावले उचलली आहेत. ५० टक्के कर्माचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम आदेश देण्यात आला आहे. सोमवारपासून सरकारी आणि खाजगी कंपन्यांचे फक्त टक्के कर्मचारी त्यांच्या कार्यालयात येतील, असा आदेश सरकारने जारी केला आहे.

डिझेल वाहनांवर बंदी
दिल्लीतील हवा दिवसेंदिवस विषारी होत आहे. राजधानी दिल्लीमध्ये प्रदूषणाची समस्या गंभीर झाली आहे. दिल्लीतील प्रदूषणाने गंभीर पातळी गाठली आहे. यामुळे कमिशन फॉर एअर क्वालिटी मॅनेजमेंटने ५ नोव्हेंबरमध्ये ग्रेडेड रिस्पॉन्स अॅक्शन प्लॅनचा टप्पा ४ लागू केला. यामुळे आता दिल्लीत डिझेल वाहनांवर बंदी घालण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.