लोकशाही न्यूज नेटवर्क
साथीच्या आजाराने थैमान घातले आहे. यात डेंग्यू आजर राज्यातील अनेक शहरांमध्ये वाढत आहे. या आजाराला आटोक्यात आणण्यात आरोग्य विभागाला मात्र अपयश येत आहे. यामुळे अनेकांना बळी गेला असून, बीड जिल्ह्यात डेंग्यू आजाराने २१ तरुणाचा मृत्यू झाला आहे. डेंग्यूच्या आजाराने २१ वर्षीय तरुणाचा बळी घेतल्याची धक्कादायक घटना बीडच्या दिंद्रुड गावात उघडकीस आली आहे. विशाल शंकर घुले असे मृत तरुणाचे नाव आहे. डेंग्यूची लागण झाल्याने तो गेल्या आठ दिवसापासून अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात उपचार घेत होता. काल सकाळी त्याची प्राणज्योत मालवली.
गावात अनेकांना लागण
दिंद्रुड गावात अनेकांना डेंगूची लागण झाली असून आरोग्य विभाग व हिवताप नियंत्रक विभागाने तात्काळ डेंगूवर नियंत्रण मिळवण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे. दरम्यान २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.