बनावट इंस्टाग्राम खाते तयार करून शेतकऱ्याच्या मुलीची बदनामी

0

यावल ;- तालुक्यातील कोरपावली येथील एका शेतकऱ्याच्या मुलीची एका बनावट इंस्टाग्राम अकाऊंटवरून फोटो टाकून बदनामी केल्याचा धक्कदायक प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणीजळगाव सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, , यावल तालुक्यातील कोरपावली गावातील एका शेतकरीचा फोटो व नावाचा वापर करून अज्ञात व्यक्तीने इंस्टाग्रामवर बनावट खाते तयार केले. त्यावेळी शेतकऱ्याच्या मुलीच्या बाबतीत आक्षेपार्ह विधान टाकून तिची बदनामी केली. हा प्रकार २३ सप्टेंबर रोजी पासून ते मंगळवारी १० ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता समोर आले आहे. हा प्रकार लक्षात आल्यानंतर तरूण शेतकऱ्याने तातडीने जळगाव सायबर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक लिलाधार कानडे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.