एका न तुटणाऱ्या नात्यासाठी पत्र : प्रिय आजोबा

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

प्रिय आजोबा,
आजवर तुम्ही मला सांभाळल, तुमचा सहवास दिला. आईवडिलांच प्रेम दिल; आणि तुमचा आनंद सोबत वाटून एक नवीन आयुष्य दिल. त्या आयुष्याचं शब्दांत रूपांतर करण्यासाठी खास तुम्हाला लिहिलेलं माझे हे पत्र वाचताना खूप आवडेल.
आजोबा.. तीन अक्षरांचा मेळ; परंतू आयुष्यभराचा आनंद ह्या शब्दात आहे. ह्या शब्दांत साऱ्या नात्यांचा मेळावा दिसून येतो. जीवापाड असलेलं आजोबांचं आपल्या नातवंडांवर प्रेम हे आई-वडिलांपेक्षाही कित्येक पटीने अधिक मोलाचं असते. त्या प्रेमाला अंत नसतोच. कारण, लहानपणी आपल्या खांद्यावर आणि बोट धरून फिरवायला कुठेही न लाजणारे एकमेव व्यक्ती म्हणजेच “आजोबा “. आणि एका ओळीत ह्या नात्याची व्याख्या सांगायची म्हटली तर; निस्वार्थ प्रेमाची परिभाषा शिकवणारी शाळा म्हणजेच “आजोबा”..
आजोळ म्हटले म्हणजे, मामा – मामीचाच गाव आठवतो परंतु, खरे तर ह्याचा खरा अर्थ फक्त लाडक्या आजोबांनाच लागतो. त्यांचा स्नेह, लळा, प्रत्येक शब्द, आणि चांगल्या संस्कारांची शिकवण ही कुणाकडून मिळूच शकत नाही. त्यांचा अनुभव जितका दांडगा तितकाच त्यांचा असलेला रुबाब सुद्धा आपल्याला त्यांसारखा राहायला कधीकधी भाग पाडतो. स्वतःच्या मुलावर ते जितके प्रेम करत नाहीत, तेवढे प्रेम आपल्या नातवाला द्यायला कधीच ते कमी होत नाहीत. आजोबांनी आणलेला खाऊ सुद्धा, हा अख्ख्या जगातलं सार दुःख बाजूला सारून चेहऱ्यावर हसू आणणारं सोनंच आहे जणू. त्यांनी भरवलेल्या प्रत्येक घासात त्यांचं प्रेम हे उमटून दिसते आणि त्याची रोज एक आठवण ही मनात साठवणूक होताना दिसते.
कधी उदास पडलेला आपला चेहरा ओळखून; आपली गरज पूर्ण करण्यासाठी जीवाचं रान करणारा अस्सल राजमाणूस म्हटले, तरी वावग ठरणार नाही. तसेच कधी आजारपणात जवळ बसून आपली सर्वात जास्त काळजी घेत एकमेव डॉक्टर बनून आपली जबाबदारी चोखपणे पार पाडणारा दवाखाना सुद्धा आपल्यासाठी होऊन जातात. आणि ते फक्त आजोबांचं असू शकतात. चुकी असताना सुद्धा आपल्या बाजूने बाजू मांडत आईचा दरवेळी मार वाचवत, आपला खरा मित्र होण्याचा न्याय ते देत असतात. त्यांच्या बोटात- बोट धरून चालताना नेहमी साऱ्या जगाची सफारी करतोय असे वाटते. त्यांच्या प्रत्येक संस्कारातून चांगल्या-वाईटाच ज्ञान हे दरवेळी मिळत असते. सर्वांचा आदर आणि सर्वांना मान देणे हाच त्यांचा गुरुमंत्र असतो. आणि हीच गोष्ट ह्या नात्याला आणखीच मजबूत करते. माणूस नाशवंत आहे, परंतु हे निस्वार्थ नातं अमर आहे. त्यांच्यात होणारा वाद सुद्धा एका हास्याने मिटणारा असतो. हे नात खास आहे , ह्या नात्यात सुवास आहे. आणि सगळयात महत्वाचं म्हणजे, ह्या नात्यात गोडवा आहे. म्हणून हे नातं श्रेष्ठ आहे, राम- हनुमानासारखं.
कधी न विसरता येणारा क्षण हा आयुष्याचा अविभाज्य भाग केव्हा बनून जातो हे कधीच कळतं नाही आजोबा. आणि तेच तुम्ही मला वेळोवेळी लाभले.

तुमचाच आवडता
विकी

विवेक भदाणे
गंगापूरी, अमळनेर
8308152826

Leave A Reply

Your email address will not be published.