जळगाव आम आदमी पार्टीने केला भाजप हुकूमशाहीचा निषेध

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

 

आज दि.11 रोजी जळगाव आम आदमी पार्टीने भाजपा सरकारच्या हुकूम शाहिचा निषेध केला. दिल्लीमध्ये असलेली आम आदमीपार्टीची सरकार असून दिल्ली सरकारला कायदे करण्याचा अधिकार व नोकर शहांवर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार या संदर्भातली केस सर्वोच्च न्यायालयात चालू होती. सर्वोच्च न्यायालयाने आम आदमी पार्टीच्या बाजूने निकाल देत भाजपा सरकारवर जोरदार टीका केली होती. मात्र भाजपा सरकारने सर्व आदेश धुडकावत दंडलशाहीचा अवलंब करत दिल्ली सरकार विरोधात नवीन अध्यादेश जारी करीत आहे. हा लोकशाहीचा व संविधानाचा अपमान आहे. याकरता आम आदमी पार्टी संपूर्ण देशभर दंडलशाहीचा निषेध करीत आहे. त्याच प्रमाणे महाराष्ट्र प्रभारी व गुजरात राज्य प्रदेश अध्यक्ष माननीय गोपाल इटालिया यांच्या आदेशानुसार तसेच जळगाव जिल्हा अध्यक्ष माननीय तुषार निकम यांच्या नेतृत्वाखाली व महानगरप्रमुख योगेश हिवरकर मार्गदर्शनाखाली जळगाव आम आदमी पार्टीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक जवळ दंडेलशाहिचा निषेधध करण्यात आला.

यावेळी अभिजीत गोसावी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी जिल्हाभरातून सर्व तालुका अध्यक्ष व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.