हृदयद्रावक, मृतदेह ट्यूबला बांधून पूर आलेली नर्मदा नदी ओलांडली…(व्हिडीओ)

0

 

मध्य प्रदेश, लोकशाही न्यूज नेटवर्क;

सामान्य माणसाला जिवंतपणी खूप समस्यांसोबत झटत राहावे लागते, त्याचं आयुष्य त्यात खर्ची पडत. मात्र जेव्हा मृत्यू होतो तेव्हा त्याची यासार्वांमधून मुक्तता होते असं म्हटल जातं, मात्र मध्य प्रदेशातील ग्रामस्थांना एका माणसाचा मृतदेह एका तरंगत्या रबर ट्यूबला बांधून पूर आलेली नर्मदा नदी ओलांडून त्यांच्या गावात न्यावा लागल्याची घटना समोर आली आहे. कारण संततधार पावसामुळे गावाला जोडणारा रस्ता बंद झाला होता.

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दिंडोरीतील पाथरकुचा आणि अनूपपूरमधील थडपथरा दरम्यान वाहणाऱ्या नर्मदा नदीवर तरंगणाऱ्या रबर ट्यूबला मृतदेह बांधलेला दिसत आहे.

अनुपपूर येथील थडपथरा गावात राहणाऱ्या ५५ वर्षीय विष्मत नंदा यांचा रविवारी हृदयविकाराच्या झटक्याने शेजारच्या दिंडोरी जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयात मृत्यू झाला त्यावेळीचे हे दृश्य.

Leave A Reply

Your email address will not be published.