Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • कुस्तीपटू अश्विनी पौळ यांची मुलांसह आत्महत्या
    • आमदारांच्या उपस्थितीत भाजप महिला आघाडीचे रक्षाबंधन
    • स्व डॉ. चारुदत्त साने यांच्या जयंतीनिमित्त रविवारी मोफत रोगनिदान शिबीराचे आयोजन
    • हल्ल्यानंतर विद्यानंद बापटांनी स्पष्ट केली मोठी भूमिका
    • उज्बेकिस्तानमधून सांगण्यापेक्षा देशात पत्रकार परिषद घ्या!
    • विमानाची पार्किंगदरम्यान खांबाला जोरदार धडक
    • बी.एन. अग्रवाल कन्स्ट्रक्शनचे निकृष्ठ काम चव्हाट्यावर!
    • अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार; त्या नराधम शिक्षकास अद्दल घडवा!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»राजकारण»अखेर शिवतीर्थावर कडाडणार ठाकरेंचीच तोफ…
    राजकारण

    अखेर शिवतीर्थावर कडाडणार ठाकरेंचीच तोफ…

    Tushar BhambareBy Tushar BhambareSeptember 23, 2022Updated:September 23, 2022No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क:

    मुंबई उच्च न्यायालयाने अखेर उद्धव ठाकरे गटाला मुंबईतील शिवाजी पार्कवर (शिवतीर्थावर) दसरा मेळावा घेण्यास परवानगी दिली आहे. न्यायालयाने शुक्रवारी आपला निकाल देताना म्हटले आहे की, महाराष्ट्र सरकारने उद्धव ठाकरे गटाला शिवाजी पार्कमध्ये २ ते ६ ऑक्टोबर दरम्यान सभा घेण्याची परवानगी द्यावी. न्यायालयाचा हा निर्णय शिवसेनेतील एकनाथ शिंदे गटाला मोठा धक्का मानला जात आहे. या खटल्याच्या सुनावणीदरम्यान शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याची एकनाथ शिंदे यांची याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे.

    उच्च न्यायालयाच्या निर्णयापूर्वी, बीएमसीच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयाच्या 2004 च्या आदेशाचा संदर्भ दिला होता, ज्यामध्ये असे नमूद केले होते की न्यायालयांनी कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीत हस्तक्षेप करू नये आणि प्रशासनाचे नियंत्रण असावे. हा निकाल देताना न्यायालयाने सांगितले की, ठाकरे गटाने ज्या दिवशी उच्च न्यायालयात धाव घेतली त्याच दिवशी बीएमसीने पोलिसांचा अहवाल मागवला. दोन्ही गटांना शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेऊ न देण्याचा बीएमसीचा निर्णय कोणत्याही प्रकारे समर्थनीय नाही, असेही न्यायालयाने म्हटले आहे.

    शुक्रवारी या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान शिवसेनेच्या (ठाकरे गट) वतीने मुंबई उच्च न्यायालयात अधिवक्ता एसपी चिनॉय म्हणाले, “शिवसेना 1966 पासून शिवाजी पार्कवर दसरा मेळावा आयोजित करत आहे. केवळ कोरोनाच्या काळात दसरा मेळावा आयोजित केला जात नव्हता. कोविडनंतर आता सर्व सण साजरे केले जात आहेत, अशा परिस्थितीत शिवसेनेच्या वतीने 2022 मध्ये दसरा मेळावा आयोजित करण्यास परवानगी द्यावी.

    #cmo #dasaramelava #eknathshinde #uddhavthackrey
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    कुस्तीपटू अश्विनी पौळ यांची मुलांसह आत्महत्या

    September 4, 2026

    आमदारांच्या उपस्थितीत भाजप महिला आघाडीचे रक्षाबंधन

    September 4, 2026

    स्व डॉ. चारुदत्त साने यांच्या जयंतीनिमित्त रविवारी मोफत रोगनिदान शिबीराचे आयोजन

    September 4, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif