शाळेतच टेबलावर चखना ,दारू घेऊन शिक्षकाने घेतला ड्रिंकचा आनंद ; व्हिडीओ व्हायरल

0

रायपूर ;- सध्या एका शिक्षकाचा व्हिडीओ समोर आलाय, ज्यामध्ये ते शाळेतच ड्रिंक करत आहेत. छत्तीसगडमधून हा व्हिडीओ व्हायरल होत असल्याचं म्हटलं जात आहे. शाळेत टेबलवर बसून शिक्षकाचा ड्रिंक करताना, चकना खाताना व्हिडीओ समोर आलाय. हा व्हिडीओ व्हायरल होताच खळबळ उडाली आहे.

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक शिक्षक शाळेत बसून दारू पिताना दिसत आहे. हा व्हिडिओ छत्तीसगडमधील बिलासपूर जिल्ह्यातील असल्याचं सांगण्यात येत आहे. ऑफिसच्या टेबलावर बसून पेग बनवत आहे आणि त्यासोबत चकनाही आणला आहे.

@govindprataps12 नावाच्या X अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. 1 मिनिट 26 सेकंदांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. व्हिडीओवर अनेक कमेंटही येताना दिसतायेत. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर अनेकांनी संताप व्यक्त केला

जेव्हा व्हिडीओ बनवणाऱ्या व्यक्तीने शिक्षकाला प्रश्न विचारला की, ‘तुम्ही शाळेत दारू पितात का?’ तर शिक्षक म्हणतात, ‘आज मी टेन्शनमध्ये आहे त्यामुळेच मी दारू पितो, नाहीतर घरीच पितो.’ हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.