मंदिरातील दानपेटी चोरट्याच्या मुसक्या आवळल्या

0

चाळीसगाव ;- तालुक्यातील हिंगोणे खुर्द येथील शाकांभरी देवी मंदिराचे कुलूप तोडून मंदिराच्या गाभाऱ्यात ठेवलेली दानपेटी चोरून नेल्याचा प्रकार घडला होता. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी कन्नड तालुक्यातील सीतामाई तांडा येथील तरुणास हर्सल जेलमधून ताब्यात घेतले.

त्याने मंदिरातील दानपेटी चोरीची कबुली दिली आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात ठेवलेल्या दानपेटीचे कुलूप तोडून अंदाजे २ हजार रुपये रकमेची चोरी अज्ञात चोरट्याने केली होती. दानपेटी चोरीच्या गुन्ह्यात संशयित आरोपीचे नाव परमेश्वर टिका (आळे) राठोड (वय ३०, सीतामाई तांडा, छत्रपती संभाजीनगर) असे आहे.

संशयित आरोपी हा हर्सल कारागृहात असल्याने हवालदार संदीप पाटील, विजय शिंदे, जयेश पवार, गोवर्धन बोरसे, शांताराम पवार यांच्या पथकाने हर्सल जेलमधून परमेश्वर राठोड यास ताब्यात घेतले. त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने मंदिरातील चोरीची कबुली दिली. त्याची अधिक चौकशी सध्या चाळीसगावचे पोलिस करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.