दहिगाव येथे स्टेट बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न

0

दहिगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

दहिगाव ता. यावल येथील प्रमुख चौकात असलेले स्टेट बँकचे एटीएम रात्री अज्ञात इसमाने फोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला, मात्र तो असफल झाला. हा प्रकार दि. २७ जुलै रोजी रात्री घडला. दहिगाव येथील प्रमुख चौकात असलेले एटीएम फोडले असल्याचे सकाळी स्टेट बँक ग्राहकांच्या लक्षात आल्यानुसार तत्काळ त्यांनी पोलीस पाटील संतोष जीवराम पाटील यांना व सरपंच अजय-अकमल यांना कळविले.

दरम्यान दोघांनी यावल येथील पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांना कळवल्यानुसार पोलीस निरीक्षक व विभागीय पोलीस अधिकारी कृणाल सोनवणे यांनी भेटी देऊन ग्रामपंचायतीने लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तपासणी केली. याप्रकरणी एका संशियतास त्यांनी ताब्यात घेतले आहे. एटीएमच्या कक्षात कुठलीही बेल किंवा कुठलीही सुरक्षा नसल्यामुळे या संधीचा फायदा चोरट्याने घेतलेला आहे. एटीएमचे पत्रा तोडून लॉक व पैसे काढण्याचा पट्टा तो तोडलेला आहे. एटीएम मशीनचे ६० ते ७० हजार रुपयांचे नुकसान चोरट्याने तोडफोड करून केलेले आहेत.

पोलिसांनी ग्रामपंचायत कार्यालयातील सीसीटीव्ही कॅमेरे व इतर तपासणी करून एकाला ताब्यात घेऊन त्याची चौकशी करण्यात येणार आहे. घटनास्थळी पंचनामा फौजदार सुदाम काकडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण यांनी केला.  गावातील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या दरवाजाचे कुलूपही गेल्या आठवड्यामध्ये चोरटयांनी तोडलेले असल्याचे वृत्त आहे.  त्याचप्रमाणे आदर्श विद्यालयात चार ते पाच वर्षांपूर्वी संगणक कक्ष तोडण्यात आला होता.  तर जिल्हा परिषद मराठी मुलांच्या शाळेत दोन वर्षात दोन वेळा एटीएम रूम फोडून नुकसान करण्यात आलेले आहे.

हे चोरटे नेमके कुठले व काय याची चौकशी व्हावी अशी मागणी परिसरातून होत आहे. तसेच गावातील पोलीस चौकीत कायमस्वरूपी एक तरी कर्मचारी रहिवासी व्हावा अशी जोरदार मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. दहिगावात अनेक वेळा रात्रीच्या वेळेस घटना घडत असतात.  एखाद्या वेळेस फार मोठा अनर्थ होऊ शकतो याला जबाबदार कोण राहणार असा प्रश्न ग्रामस्थ करीत आहेत. घटनेची फिर्याद एटीएम वेंडर दीपक दौलत तिवारी यांनी यावल पोलिसात दिल्यावरून गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. पोलीस अधिकारी कृणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिलीप भागवत व सहकारी करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.