मोठी बातमी; निलेश राणेंच्या ताफ्यावर दगडफेक

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

भाजप नेते निलेश राणे यांच्या ताफ्यातील गाड्यांवर दगडफेक केल्याचा प्रचार समोर आला आहे. गुहानगर येथे भास्कर जाधव आणि निलेश राणे यांच्या कार्यकर्ते भिडल्याचे दिसत आहे. यावेळी राणे समर्थक आणि ठाकरे समर्थकांनी दगडफेक करत जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी पोलिसांना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अश्रुधाराच्या कांड्या फोडल्या.

मिळालेल्या माहितीनुसार, भाजपचे माजी आमदार निलेश राणे यांची गुहागर येथे जाहीर सभा होती. भास्कर जाधव यांच्या मतदारसंघात तळी येथे होत असलेल्या या सभेला विरोध केला जात होता. यावेळी भास्कर जाधव यांचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. निलेश राणे यांच्या सभेपूर्वी हा राडा झाला.

Leave A Reply

Your email address will not be published.