पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात, तीन जणांचा होरपळून मृत्यू

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर मंचरच्या दक्षिण बाजूला तीन किलोमीटर अंतरावर भोररवाडी तांबडे मळा येथे आज सकाळी स्विफ्ट कार, टेम्पो व कंटेनरच्या विचित्र अपघातात. स्विफ्ट कर जागीच जळून खाक झाली आहे. स्विफ्ट मधील ३ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. सुदैवाने स्विफ्ट कारचा चालक व टेम्पोचा चालक बचावला आहे. मृत तीन तरुण खेड तालुक्यातील राक्षेवाडी येथील असल्याची माहिती समोर येत आहे. या परिसरात वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात झाली आहे.

मंचर पासून जवळच असणाऱ्या भोरवाडी परिसरात पुणे-नाशिक महामार्गावर पुण्याच्या दिशेने जाणारा एक कंटेनर (G.J 01 WB 1737) बंद अवस्थेत उभा होता. त्याच ठिकाणी आज सकाळी टेम्पो (MH 12 QG 3351) व स्विफ्ट कार (MH 14 DT 0295) यांच्यात जोरदार धडक झाली. धडक झाल्यानंतर टेम्पो पुढे जाऊन उभ्या असलेल्या कंटेनरला धडकला तर स्विफ्ट गाडीने पेट घेतला. त्यात स्विफ्ट गाडी पूर्णतः जळून खाक झाली आहे.

या अपघातात स्विफ्ट गाडीतील तीन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर सुदैवाने स्विफ्ट कारचा चालक व टेम्पो चालक बचावले आहे. मृत झालेल्या व्यक्तींचा तपशील अद्याप प्राप्त झालेला नाही. मंचरची पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण फुगे पोलीस उपनिरीक्षक सोमेश्वर शेटे पोलीस नाईक राजेंद्र हिले, नंदकुमार आढारीयंत्रणा याबाबत कसून चौकशी करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.