टीम इंडियाचे खेळाडू ‘या’ कारणाने उतरले काळ्या पट्ट्या बांधून मैदानात

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा कसोटी सामना राजकोटमध्ये सुरु आहे. या सामन्यांच्या तिसऱ्या दिवशी भारतीय खेळाडू हातावर काळ्या रंगाची पट्टी बांधून उतरले आहे. बीसीसीआयने पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली आहे. भारताचे माजी कर्णधार आणि सर्वात वयस्कर क्रिकेटपटू दत्ताजीराव गायकवाड यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी भारतीय खेळाडूंनी हातावर काळी पट्टी बांधली आहे.

दिग्गज खेळाडू दत्ताजीराव गायकवाड यांचे १३ फेब्रुवारी रोजी वृद्धपकाळाने निधन झाले आहे. ते भारताचे वयस्कर क्रिकेटपटू होतो. वयाच्या ९६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. बीसीसीआयने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात त्यांनी लिहिले की, ‘भारतीय संघाचे माजी कर्णधार आणि सर्वात वयस्कर खेळाडू दत्ताजीराव गायकवाड यांच्या आठवणीत भारतीय खेळाडू काळी पट्टी बांधून मैदानावर उतरणार आहेत.’

भारताचे सर्वात वयस्कर खेळाडू
दत्ताजीराव गायकवाड यांनी रणजी ट्रॉफी स्पर्धेत बडोदा संघाचं प्रतिनिधित्व केलं. ते १९४७ पासून ते १९६१ पर्यंत बडोदा संघासाठी क्रिकेट खेळले. यादरम्यान त्यांनी ४७.५६ च्या सरासरीने ३१३९ धावा केल्या. यात १४ शतकांचा समावेश आहे. तसेच नाबाद २४९ धावा ही त्यांची सर्वोत्तम खेळी आहे. ही खेळी त्यांनी १९५९-६० च्या रणजी हंगामात महाराष्ट्र संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात केली होती. २०१६ मध्ये ते भारताचे सर्वात वयस्कर खेळाडू ठरले होते. यापूर्वी दिपक शोधने हे भारताचे सर्वात वयस्कर क्रिकेटपटू होते. त्यांचे वयाच्या ८७ व्या वर्षी निधन झाले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.