नवी दिल्लीत अचानक कोसळला मंडप, अनेक जण अडकल्याची भीती

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

जवाहरलाल नेहरू स्टेडियम गेट क्र.२ मधून प्रवेश करताना मंडप कोसळल्याची माहिती मिळत आहेत. यात अनेक लोक अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचं काम सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आठ पेक्षा अधिकजण जखमी झाले आहेत. अचानक मंडप कोसळल्याने लोकांची धावपळ उडाली होती. अनेकजण मंडपाखाली अडकले आहेत. त्यांना बाहेर काढण्याचं काम युद्धपटलीवर सुरु आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशन दल घटनास्थळी आले होते. जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये काम करणाऱ्या सुरक्षा रक्षकाने सांगितले की, कर्मचारी जेवणासाठी गेले असतांना हा भयानक प्रकार घडला आहे. त्यामुळे मोठा अनर्थ टाळला एएनआएने यासंदर्भातील माहिती दिली आहे. दिल्ली पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.