कुटुंबाने एकटे पाडल्याचा ‘अजित पवार’ यांचा दावा, वाचा सविस्तर

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

बारामतीमधील अजित पवार गटाचा बूथ कमिटी मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्या दरम्यान बोलताना अजित पवार यांनी आपल्या परिवारात एकटं पाडण्यात आल्याची भावना व्यक्त केली. त्यांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचे नाव न घेता त्यांच्यावर जोरदार टीका केली. अजित पवार यांच्या वक्तव्यावर शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. “संपूर्ण लोक एका कुटुंबाच्या मागे आहेत आणि मीच एकटा आहे”. हे भाषण म्हणजे लोकांना भावनिक करून त्यांची सहानुभूती मिळवण्याचे काम आहे. अशा शब्दात शरद पवार यांनी अजित पवार यांना टोला लगावला.

राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्ह हातून गेल्यानंतर शरद पवार पहिल्यांदाच बारामती मध्ये आहेत. दुपारी त्यांनी माध्यमांशी बोलताना अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. अनेक वेळा त्यांनी विधानसभा अध्यक्षांवरही टीका केली. “पक्ष चिन्ह काढून घेणे, हा आमच्यावर अन्याय आहे. पक्ष आणि चिन्ह बाबतचा निर्णय सेटलमेंट करून घेतला गेला” असा हल्ला बोल शरद पवार यांनी केला. आम्ही भावनात्मक अपील करण्याचं कारण नाही. कारण बारामतीचे लोक आम्हाला वर्षानुवर्षी ओळखत आहेत. त्यामुळे आम्हाला भावनात्मक अपील करण्याची गरज नाही. पण विरोधकांकडून ज्याप्रमाणे भाषा वापरली जाते, त्यांचे भाषण पाहता बारामतीचे लोक नोंद घेतील.

लोकांची सहानुभूती मिळवण्याचे काम
बारामतीमध्ये एकटे पडला जात आहे. या अजित पवारांच्या विधानाचाही समाचार घेतला. उमेदवार कोणीही असो तरी त्याला निवडणुकीत मतदारांची साथ मागण्याचा अधिकार आहेत. पण संपूर्ण लोक एका कुटुंबाच्या मागे आहेत आणि मीच एकटा आहे. असं भासवण्याचा म्हणजे लोकांना भावनिक करण्यासारखा आहे. लोकांची सहानुभूती मिळवण्याचं काम आहे. असे शरद पवार म्हणाले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.