शिरागड येथील युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

0

लोकशाही न्युज नेटवर्क

मनवेल (ता.यावल) येथून जवळच असलेल्या शिरागड येथील अविवाहित तरुणाने आपल्या शेताच्या बांधावर गळफास घेवुन आत्महत्या केल्याची घटना घडली. सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास घडली असून, एकच खळबळ उडाली असून याबाबत यावल पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

या संदर्भात पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, महेश कैलास सोळके (वय-२५ वर्ष रा.शिरागड ता. यावल) या अविवाहित तरुण शेतकऱ्यांने १६ फेब्रुवारी शुक्रवार रोजी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास आपल्या गट क्रमांक- ११८ या शेताच्या बांधावर असलेल्या निंबाच्या झाडावर दोरीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. आत्महत्या करण्याचे कारण समोर आलेले नाही.

याबाबत शिरागड गावातील पोलीस पाटील सुधाकर नारायण सोळुंके यांनी खबर दिल्याने यावल पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक हरिष भोये यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉस्टेबल सिकंदर तडवी हे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.