तुमचा मोबाईल करू शकतो तुमचीच ‘हेरगिरी’; गोपनीयता होऊ शकते उघड ..

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

तुमचा आवडता मोबाईल तुमचीच हेरगिरी करू शकतो. तुम्ही काय करत आहात? कुठे जात आहात? याची माहिती तुमच्या प्रतिस्पर्ध्याला किंवा इतर व्यक्तीला देऊ शकतो. यामुळे इंटरनेटच्या या युगात आपला मोबाईल आपलीच हेरगिरी तर करत नाही ना? याची विशेष काळजी घेण्याची गरज आहे.

बाजारात सहजरित्या उपलब्ध असलेले सॉफ्टवेअर, काही अ‍ॅप दुसर्‍याच्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करून माहिती मिळविता येते. सध्या निवडणुकीचा काळ असल्याने असे प्रकार वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक, व्यावसायिक आणि इच्छुक उमेदवारांनाही सावधान राहण्याची गरज आहे.

सध्या स्पर्धेचे युग असून आपला राजकीय प्रतिस्पर्धी काय करतो? कसा करतो? आणि त्याचा पुढचा प्लान काय आहे? हे जाणुन घेण्याची अनेकांची उत्सुकता असते. त्याचप्रमाणे व्यापारी, प्रियकर-प्रेयसी, पती-पत्नी सुद्धा आपल्या जोडीदाराच्या हालचालींवर लक्ष ठेवून गूपिते जाणून घेण्यासाठी या स्पायवेअरचा गैरवापर करू शकतात. हे स्पायवेअर मोबाईलमध्ये इंस्टाल झाल्यानंतर आपल्या मोबाईलचा ताबा दुसर्‍या व्यक्तीकडेही जातो. त्यामुळे आपल्याला येणारे टेक्स्ट मॅसेज, व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक मॅसेज, मोबाईलवर येणार्‍या जाणार्‍या कॉलची माहिती आणि रेकॉर्डिंग, मोबाईलमधील फोटो, व्हिडीओ या सर्व बाबीची माहिती प्रतिस्पर्ध्याला किंवा सायबर गुन्हेगारांना अगदी सहजरित्या मिळू शकते. तसेच मोबाईलमध्ये काय सर्च केले, आपले सध्याचे लोकेशन देखील मिळते. यामध्ये सर्वात धोकादायक आहे ते म्हणजे बँकेचे व्यवहार, ते देखील दुसर्‍याच्या ताब्यात जावू शकतात. अशा घटना अनेक ठिकाणी घडल्या आहेत, घडत आहेत. त्यामुळे या स्पायवेअरमुळे सामाजिक, आर्थिक आणि वैयक्तिक आयुष्य धोक्यात येऊ शकते. त्यामुळे मोबाईल संदर्भात सर्वांनी काळजी घेणे आवश्यक आहे.

अशी बाळगा सावधानता !

अनोळखी आणि आकर्षित करणारे पॉपअप्स-लिंक उघडू नये. दुसर्‍याच्या हातात मोबाईल देतानाा स्वतः लक्ष ठेवा. ज्या वेबसाइड https ने सुरू होतात त्या सुरक्षित तर केवळ https सुरू होणार्‍या असुरक्षित असतात. आपले मोबाईल सॉफ्टवेअर सिस्टीम आणि अ‍ॅप्स अपडेट्स करत रहा. अधून मधून मोबाईलचे ‘प्ले स्टोर’ वरून ‘प्ले प्रोटेक्ट’द्वारे स्कॅन करावे. धोकादायक अ‍ॅप्स दाखविल्यास ते डिलीट करून मोबाईल सुरक्षित करावा. आपला महत्वाचा डेटा इनस्किप्ट करून ठेवावा. त्यामुळे जरी आपला फोन हॅक झाल्यास महत्त्वाची माहिती सायबर गुन्हेगारांच्या हाती जाणार नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.