डॉ. मीनल आणि डॉ. अंतिम सोमाणी यांना माहेश्वरी कोरोना योद्धा पुरस्कार

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

कोरोना विषाणूने संपूर्ण जगभरात थैमान घेतले होते. या महामारीच्या कठीण काळात उत्कृष्ट सेवा देवून समाजात एक आदर्श निर्माण करणाऱ्या डॉ. मीनल सोमाणी आणि डॉ. अंतिम सोमाणी यांना महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी युवा संगठन यांच्या वतीने माहेश्वरी कोरोना योद्धा पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.

यावेळी डॉ. सोमाणी म्हणाले की, आम्ही त्या सर्वशक्तिमान ईश्वराप्रती ऋण व्यक्त करतो की त्याने कोरोनाच्या काळात आम्हाला लढण्याची ताकद व प्रेरणा दिली. या मिळालेल्या पुरस्काराबद्दल सर्वच क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.