देवगाव शिवारात गळा चिरलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

नाशिक (देवगाव) :  जिल्ह्यातील देवगाव कानळद रस्त्यालगत देवगाव शिवारात दुपारी साडेबाराच्या सुमारास गळा चिरलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला आहे. अल्लाउद्दीन समसुभाई खाटीक (54, रा. मंजूर, हंडेवाडी फाटा) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

शेतकरी राजेंद्र बोचरे यांना गुरुवारी (दि. 7) दुपारी साडेबाराच्या सुमारास देवगाव शिवारात दुचाकी (एमएच 15 ईसी 4436) आढळली व नजीकच मृतदेह आढळला. त्यांनी लासलगाव पोलिस ठाण्याला खबर दिली असता, अपर पोलिस अधीक्षक माधुरी कांगणे, गुन्हे शोधचे उपअधीक्षक हेमंत पाटील, उपअधीक्षक सोमनाथ तांबे, लासलगावचे सहायक निरीक्षक राहुल वाघ यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली असता, त्यांना गळा चिरलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला.

अनिल देशमुख यांना जामीन मिळणार? जामीन न मिळण्यासाठी ईडीचे न्यायालयाला ५६ पानी प्रतिज्ञापत्र

चौकशीत मृत व्यक्ती अल्लाउद्दीन समसुभाई खाटीक असल्याचे निष्पन्न झाले. त्यांचे पाय बांधलेल्या अवस्थेत होते. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी निफाड ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. याबाबत पोलिस उपनिरीक्षक आदिनाथ कोठाळे, उपनिरीक्षक रामकृष्ण सोनवणे हे गुन्ह्याचा तपास करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.