धक्कादायक..पैसे मागितल्याच्या रागातून मेडीकल दुकानदारावर चॉपरने हल्ला

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

जळगाव ; जळगाव तालुक्यातील शिरसोली येथे मेडीकल गोळ्याचे पैसे मागितल्याचा रागातून मेडीकल दुकानदारावर चॉपर हल्ला केल्याची धक्कादायक घटना शिरसोली येथे घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव तालुक्यातील शिरसोली येथे नरेंद्र अमत खलसे (वय-२६) यांचे शिरसोली येथे मेडीकल दुकान आहे. मेडीकल दुकान चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. ११ मार्च रोजी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास गावातील निलेश अरूण पाटील हा मेडीकल दुकानावर आला.

त्याने पेन किलरच्या गोळ्या घेतल्या आणि निघून जात असतांना मेडीकल दुकानदार नरेंद्र खलसे यांने गोळ्यांचे पैसे मागितले. याचा राग निलेशला आला. त्याने हातातील चॉपर घेवून नरेंद्र खलसेवर हल्ला चढविला. यात नरेंद्रला गळ्याच्या खाली गंभीर दुखापत झाली व जीवे ठार मरण्याची धमकी दिली.

जखमी झालेल्या नरेंद्रला तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात संशयित आरोपी निलेश पाटील याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ जितेंद्र राठोड करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.