तरुणाला मारहाण करत कोयत्याने वार; एकाला अटक

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

जळगाव; जळगाव शहरात जानकीनगरातील जुन्या भांडणाच्या रागातून तरुणाला कोयत्याने मारहाण केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी एका संशयिताला अटक केली आहे. त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. तर अल्पवयीन संशयितालाही नोटीस बजावली आहे. याबाबत एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल आहे.

शहरातील जानकीनगरातील रहिवासी गोपाल सोनवणे याचे त्याचा मित्र भुषण नावाच्या तरुणासोबत भांडण झाले होते. या भांडणाचा राग मनात ठेवून शुक्रवारी ११ मार्च रोजी गोपाल याला अल्पवयीन मुलगा व दर्शन अभिमान चौधरी दोन्ही रा. गणेशवाडी तसेच कुणाल कोळी रा. जैनाबाद या तिघांनी घरात घुसुन बेदम मारहाण केली.

अल्पवयीन मुलाने कोयत्याने  गोपाल याच्या डोक्यावर मारला तर भांडण सोडविण्यास गोपालचे वडील गेले असता त्यांच्या डोक्यात वीट मारुन त्यांना गंभीर जखमी केले तसेच तक्रार केली तर जीवेठार मारण्याची  धमकी दिली होती.

याप्रकरणी जखमीच्या बहिणीने दिलेल्या तक्रारीवरुन तिघांविरुद्ध  एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.