बसवर हल्ला करणाऱ्या आरोपींना ताब्यात घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यास धक्काबुक्की

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

धुळे ;धुळे शहरातील साक्री रस्त्यावर हा प्रकार घडला आहे.  गुजरात राज्यातील आराम बसवर काचेची बाटली फेकून हल्ला करणाऱ्या तिघांना ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की झाल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धुळे शहरातील साक्री रस्त्यावर हा प्रकार घडला आहे. गुजरात राज्यातील जिजे 16 झेड 55 55 या क्रमांकाची आराम बस जात असताना या बसच्या काचेवर बाटली मारून हल्ला करण्यात आला. त्यामुळे बसच्या काचेचे नुकसान झाले.

त्यामुळे बसचालकाने शहर पोलिस ठाणे गाठून या घटनेची माहिती दिली. या नंतर शहर पोलिस ठाण्यात नेमणुकीस असणारे निलेश कालिदास पोद्दार हे हल्ला करणाऱ्या व्यक्ती गुलाब शिरसाट, लक्ष्मण तानाजी बोरसे आणि राजा साळवे या तिघांना ताब्यात घेण्यासाठी साक्री रोडवर गेले. यावेळी या तिघांनी पोतदार यांना धक्काबुक्की करीत शासकीय कामात अडथळा आणला.

त्यामुळे पोतदार यांनी ही माहिती शहर पोलिस ठाण्याला कळवली. त्यानुसार पोलिस निरीक्षक नितीन देशमुख, सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष तीगोटे हे पथकासह घटनास्थळी रवाना झाले. दरम्यान आरोपींनी घटनास्थळी करून पलायन केले.

पोलिस पथकाने विकि शिरसाट याला ताब्यात घेतले असून तीघा आरोपींच्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात भादवि कलम 353, 332, 427, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.