Sunday, May 29, 2022

ड् पत्रक यादीत नाव टाकण्यासाठी बीडीओ ग्रामसेवक यांनी गरीबांकडुन घेतले पैसे.पीड़ित लोक करणार उपोषण

spot_imgspot_img
- Advertisement -
- Advertisement -

लोकशाही न्यूज नेटवर्क 

- Advertisement -

चोपडा ; गेल्या दोन महिन्यापासून पंचायत समिती च्या आवारात शेकडो गोरगरीब लोक रमाई व शबरी घरकुल योजनेच्या घरकुला साठी भुकेले तांहानलेले फिरत असुन बीडीओ व ग्रामसेवक आणि राजकीय पदाधिकारी यांनी गरीबांच्या टाळूवरील लोणी खावून गायब झाल्याचे चित्र दिसत आहे.

- Advertisement -

लाखो रुपये बीडीओला दिले असल्याची चर्चा ही सर्वत्र जोर धरत असुन,काही दिवसांपूर्वी डॉ चंद्रकांत बारेला यांनी ही या गोष्टिविरुद्ध आवाज़ उठविला होता.ज्या ज्या ग्रामसेवकानी,आणि पंस सदस्यानी  घरकुल मिळवून देण्यासाठी गोरगरीब जनतेकड़ून पैसे जमा करुंन बीडीओ जवळ दिले त्यांची नाव ड् पत्रक यादीत आली नाहीत साहेबच एक महीना गायब होवून गेल्याने,ग्रामसेवक व सदस्य ही वैतागुन साहेबा विरुद्ध राग व्यक्त करताना दिसत आहेत.

काही आजी माजी पं.स.सदस्य व सभापती यांनी काम करा हो साहेब तुम्ही खुलेआम पैसे घेवून फरार झालेत,येथे आम्ही जनतेला काय्य तोंड दाखवू अस विचारले म्हणून बीडीओ ने काही सदस्याचे फोन नंबर ब्लैक लिस्ट मधे टाकून साहेब गायब झाल्यामुळे सर्वाना साहेबावर संशय आला असल्याने बिंग फुटले.

घरकुल च काय्य?पण गोठ्यासाठी ही प्रत्येक गावातून पदाधिकारी ग्रामसेवकानी लाखो रुपये गरीब शेतकऱ्यांकडुन गोळा केल्याचे पुरावे देण्यासाठी काही पीड़ित लोक लोकशाहीच्या पत्रकाराकड़े येवून गेले,अश्य्या शेकडो लोकांची फसवणूक करणाऱ्या अधिकार्याची ग्रामसेवकाची बैंक खाते,सील करावे,व्यवहार,त्यांची प्रोपर्टी ची चौकशी करण्याची मागणी माजी जि.प.सदस्य बाळासाहेब पाटील यांनी केली आहे.पीडित गोरगरीब जनतेला फ़सवणाऱ्याची  नाव व पुरावे,कागदपत्रक लवकरच आमच्या कड़े येतील व आम्ही आमच्या दैनिकाच्या वतीने पीड़ीताना न्याय देण्याचे काम करणार आहोत.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या