ट्रेडिंगमध्ये गुंतवणुकीचे आमिष देत ८ लाखांची ऑनलाईन फसवणूक

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

जळगाव ; ट्रेडिंगमध्ये गुंतवणुकीचे आमिष देत ८ लाखांची ऑनलाईन फसवणूक. ट्रेंडींगमध्ये गुंतवणूक करण्याचे सांगत नफा मिळून देण्याचे आमिष दाखवत भुसावळ येथील एकाला ८ लाख ८५ हजारात ऑनलाईन फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी जळगाव सायबर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

भुसावळ शहरातील शिवदत्त नगर येथे देवेंद्र मोतीराम सिडाम (वय-३३) हे वास्तव्यास आहेत. महावितरण कंपनीच्या सहाय्यक अभियंता म्हणून नोकरीला आहे. देवेंद्र सिडाम यांना २६ डिसेंबर २०२१ ते १० फेब्रुवारी २०२२ दरम्यान विविध अनोळखी व्यक्तींनी वेगवेगळया मोबाईल क्रमांकावरुन संपर्क साधला.

तसेच गोल्डबार्स यामध्ये ट्रेडिंग केल्यास तुम्हाला चांगला नफा मिळेल अशी बतावणी संबंधितांनी केली. यावर विश्वास ठेवत देवेंद्र सिडाम यांनी ८ लाख ८५ हजार रुपयांची गुंतवणूक केली. या गुंतवणुकीवर २५ लाख रुपयांचा नफा झाल्याचा असल्याचेही संबंधित अनोळखींनी फोनवरुन बोलतांना सिडाम यांना सांगितले.

मात्र प्रत्यक्षात आजपावेतो कुठल्याही नफ्याची रक्कम मिळाली नाही. तसेच गुंतवणूक केलेले ८ लाख ८५ हजार रुपये न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याची लक्षात आले. अखेर शनिवार, २ एप्रिल रोजी जळगाव सायबर पोलिसात तक्रार दिली. या तक्रारीवरुन अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आहे पुढील तपास पोलीस निरिक्षक लिलाधर कानडे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.