माझे गांव, माझा इतिहास शिरुड येथे प्रकाशन सोहळा आमदारांच्या हस्ते झकास

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

रजनीकांत पाटील

अमळनेर :-  तालुक्यातील शिरुड येथील प्रगतिशील आदर्श शेतकरी भालेराव उत्तम पाटील यांचे ज्येष्ठ चिरंजीव प्रा.डॉ सुनील भालेराव पाटील इतिहास विभाग प्रमुख सातपुडा शिक्षण प्रसारक मंडळ वसंतराव नाईक कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय शहादा  लिखित ‘माझ गाव माझा इतिहास’ या पुस्तकाचे प्रकाशन  गुढीपाडवाच्या पार्श्वभूमीवर  शिरूड ग्रामपंचायत या ठिकाणी  आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

ज्या गावात आपण लहानाचे मोठे झालो आपली जन्मभूमी अशा गावासाठी काहीतरी वेगळे करावे नोकरी निमित्त बाहेरगावी राहिल्याने गावची माहिती लिहिण्याचे धाडस त्यांनी केले. आहे गावाचे नाव लौकिक व्हावे. महान कार्याचा विसर पडू नये तसेच नवीन पिढीला त्याच्या कार्याची माहिती व्हावी. भूतकाळातील घडलेल्या घटनांचा संदर्भ लक्षात घेण्यासाठी गावाचा इतिहास काय? काळाच्या पडद्याआड गेलेले घटना मांडून आपलाच गौरवशाली इतिहास ‘माझं गाव माझा इतिहास’ या पुस्तकाच्या माध्यमातून समाजापुढे ठेवण्याचा हेतू प्रा. डॉ. सुनिल पाटील यांनी केला आहे.

आमदार अनिल पाटील व इतर मान्यवरांच्या हस्ते प्रथम सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करत  मान्यवरांचा सत्कार समारंभ करण्यात आला व कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.यावेळी पं.स माजी सभापती शाम अहिरे, मा.प्राचार्य.डॉ वसंत देसले, प्राचार्य डॉ.विलास सोनवणे कृ.उ.बा.स ताईसो तिलोत्तम पाटील, किसान कॉग्रेस ता.अध्यक्ष प्रा.सुभाष पाटील, मुंडी संस्थेचे संचालक जयवंतराव पाटील,

सरपंच गोविंदा सोनवणे,उपसरपंच कल्याणी पाटील, पो.पा विश्वास महाजन, नारायण पाटील, पोपट बारकू पाटील, प्रफुल्ल पाटील,योजना पाटील, सुरेश पाटील, आनंदराव पाटील, दिलीप पाटील, धर्मेंद्र पाटील, रवींद्र धनगर सर्व ग्रामपंचायत सदस्य गावातील नागरिकांची उपस्थिती होती. ‘माझं गाव माझा इतिहास’ पुस्तकाचे प्रकाशन सोहळा संपन्न करण्यात आला.

साने गुरुजी विद्यालय  शिक्षक डी. ए. धनगर सर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले व प्रा. डॉ.  सुनील पाटील यांनी प्रास्ताविक व कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी रजनीकांत पाटील, सतिश पाटील, मंथन पाटील, यश धनगर, अक्षय देवरे, नीलकंठ पाटील ….

यांनी परीश्रम घेतले

पडद्याआड गेलेला इतिहास समाजापुढे- प्रा. डॉ सुनील पाटील

‘गड्या आपला गाव बरा’ आणि ‘गाव करी ते राव करी’ या प्रचलित

म्हणीनुसार गावाची महती ऐकली होती, तसेच लहानपणी प्राथमिक शाळेत शिकत असताना. शाळेची माहिती, बैलाची माहिती, गायीची माहिती, घोड्याची माहिती आणि गावाची माहिती यावर निबंध लिहीत असतो. आपण ज्या गावात लहानाचे मोठे झालो, तसेच आपली जन्मभूमी, ज्या गावाने आपल्याला नाव दिले, अशा गावासाठी काहीतरी करावे, ही भावना मनात वाढीस लागली.

नोकरीनिमित्ताने गावापासून लांब राहिल्याने गावासाठी काहीतरी करण्याच्या भावनेतून गावाची माहिती लिहिण्याचे धाडस केले. ‘माझे गाव-माझा इतिहास’ या गावाबाबत माहिती देणारी माहिती पुस्तिका लिहली.  गावास अनेक वर्षांची सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरा लाभली आहे.

तालुकापातळीवर गावातील अनेक कर्तृत्ववान, धाडसी व्यक्तींनी नेतृत्व केले आहे. भारतीय व्यक्ती अनेक क्षेत्रांत भीम पराक्रम करतो; पण या पराक्रमांची माहिती लिहून ठेवत नाही. आपल्याही गावात ज्यांच्या नावाने तालुक्यात गावाचे नाव प्रचलित होते, अशा महान कार्याचा विसर पडू नये, तसेच नवीन पिढीला त्यांच्या कार्याची माहिती व्हावी म्हणून याबाबतचे लेखन केले आहे. जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील शिरूड गावाची माहिती लिहिली.

इतिहासाचे स्थळ आणि काळ या दोन्ही महत्त्वाची  ज्ञानेंद्रिये आहेत. भूतकाळातील घडलेल्या घटनांचा संदर्भ लक्षात घेण्यासाठी ही दोन केंद्रीय साधने लक्षात घेणे आवश्यक आहे त्याशिवाय ऐतिहासिक घटनांचे आकलन शक्य नाही या ज्ञान साधनांपैकी स्थळांचा संबंध क्षेत्र भूमी आणि जमिनीशी असतो. कोणत्याही ऐतिहासिक घटनांचे स्थळ बदलणे शक्य नसते तसेच गेलेली वेळ पुन्हा परत येत नसते. सर्वकाळ या दोन्ही घटनांचा व्यक्त व समाज जीवनावर परिणाम होत असतो.

गावाचा स्थानिक इतिहास ऐतिहासिक,सामाजिक, भौगोलिक पैलु गावाची लोकसंख्या व विस्तार दळणवळण शेती व पिके समाज आणि त्यांची कुळे विहिरी आड गावात पडलेला दरोडा गावातील देवस्थाने याच्या पलीकडे गावाचा पूर्वीचा अज्ञात माहितीचा इतिहासिक  नव्या पिढीला ज्ञात व्हावा हा यामागचा हेतू आहे. तसेच भारतीय मानव आपण केलेल्या कोणते कामाची नोंद ठेवत नाही.

परिणामी काढत आपले अमूल्य सहकार्य काळाबरोबरच विसर पडत आहे. म्हणून काळाच्या पडद्याआड गेलेल्या घटना मांडून आपलाच गौरवशाली इतिहास समाजापुढे ठेवण्याचा. हेतू प्रा.डॉ सुनील पाटील यांनी गावातील समाजजीवनाचे सूक्ष्म व  प्राथमिक चित्र रेखाटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.