काळिमा: शिक्षकाचा विद्यार्थिनींवर बलात्कार

फोनमध्ये 45 अश्लील व्हिडिओ

0

सुरत, लोकशाही न्यूज नेटवर्क 

शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या पवित्र नात्याला काळिमा लावणारी घटना गुजरातमधून समोर आलीय. एका शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनींवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. त्याच्या फोनमध्ये 45 अश्लील व्हिडिओ सापडले असून, या शिक्षकाने अनेक विद्यार्थिनींवर अत्याचार केल्याचं स्पष्ट झालं आहे. याप्रकरणी  संबंधित शिक्षकावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

गुजरातमधल्या बडोद्यातल्या 17 वर्षांच्या विद्यार्थिनीवर बलात्कार करणाऱ्या शिक्षकाबाबत अनेक नवीन बाबी उघड होत आहेत. या शिक्षकाने केवळ या विद्यार्थिनीसोबतच नव्हे, तर अनेक विद्यार्थिनींचं लैंगिक शोषण केलेलं आहे. आरोपीच्या फोनमध्ये 45 अश्लील व्हिडिओ सापडले असून, हे व्हिडिओ या शिक्षकाने चित्रित केले आहेत. जेव्हा तो मुलींवर बलात्कार करायचा तेव्हा तो त्या दुष्कृत्यांचा व्हिडिओ बनवायचा. आरोपीनं हे व्हिडिओ डिलीट केले नव्हते. यापैकी काही व्हिडिओत तो स्वतःसुद्धा दिसत आहे.

एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार करून तिला गर्भवती केल्याप्रकरणी पॉक्सो न्यायालयाने नुकतंच एका शिक्षकाला दोषी ठरवलं होतं. संबंधित शिक्षकाच्या फोनमध्ये अनेक अश्लील व्हिडिओ सापडले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एकूण 45 व्हिडिओंपैकी 12 व्हिडिओमध्ये हा शिक्षक स्वतः विद्यार्थिनींशी गैरवर्तन करताना दिसत आहे. उर्वरित व्हिडिओंमध्ये फक्त पीडित मुली दिसत आहेत. या व्हिडिओंबाबत संबंधित शिक्षकाविरुद्ध पुन्हा वेगळा एफआयर नोंदवला गेला. याबाबतची सुनावणी सध्या पॉक्सो न्यायालयात सुरू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.