Sunday, November 27, 2022

शेतात नेवून महिलेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न

- Advertisement -

रावेर, लोकशाही न्यूज नेटवर्क 

- Advertisement -

रावेर तालुक्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सावदा ते रावेर रोडवर ३५ वर्षीय महिलेला दुचाकीवरून बसवून नेत तिचा विनयभंग केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी निंभोरा पोलीस ठाण्यात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

- Advertisement -

मुक्ताईनगर तालुक्यात राहणारी ३५ वर्षीय महिला ही २२ जुलै रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास रावेर ते सावदा रस्त्याने पायी घरी जात होत्या. त्यावेळी रस्त्याने चिंतामन विक्रम बारेला रा. नाचणखेडा ता. बऱ्हाणपूर आणि राजेश मुकेश बारेला रा. इंटारिया ता. झीरण्या जि. खरगोर हे दोघे दुचाकीने रस्त्यावरून जात असतांना गावाकडे सोडून देतो असे सांगून तिला दुचाकीवर बसविले. त्यानंतर तिचा हात पकडून शेतात नेऊन तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, कशीबशी दोघांच्या तावडीतून सुटून महिला निंभोरा पोलीस ठाण्यात धाव घेतली. महिलेच्या फिर्यादीवरून निभांरा पोलीस ठाण्यात चिंतामन विक्रम बारेला रा. नाचणखेडा ता. बऱ्हाणपूर आणि राजेश मुकेश बारेला रा. इंटारिया ता. झीरण्या जि. खरगोर या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या