महिलेवर अनैसर्गिक अत्याचार ; राष्ट्रवादीच्या माजी पदाधिकाऱ्यावर गुन्हा

0

छत्रपती संभाजीनगर , लोकशाही न्यूज नेटवर्क
छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) येथे धक्कादायक प्रकार समोर आला असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) पदाधिकाऱ्याने एका महिलेला गुंगीचे औषध पाजून अनैसर्गिक अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तुझ्या मुलांचे अपहरण करून पतीला मारहाण करून तुझा संसार उद्ध्वस्त करण्याची धमकी देत आरोपीने 33 वर्षीय विवाहितेला पाण्यात गुंगीचे औषध पाजून तिच्यावर अनैसर्गिक अत्याचार केल्याचं तक्रारीत म्हटले आहे. संतापजनक म्हणजे अत्याचार करतानाचा व्हिडिओ बनवून तो व्हायरल करण्याची धमकी देखील दिली. मुख्तार खान उर्फ बब्बु (वय 42 वर्ष, रा. नूर कॉलनी, टाऊन हॉल परिसर) असे आरोपीचे नाव असून, तो राष्ट्रवादी काँग्रेसचा माजी पदाधिकारी असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.