जळगाव कृउबा समिती सभापतीपदासाठी चुरस

0

जळगाव : जळगाव कृषि उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत महाविकास आघाडीने दणदणीत विजय मिळवून १८ पैकी ११ जागा जिंकल्या आहेत. तर शिवसेना-भाजप युतीचा या निवडणुकीत पराभव झाला असून त्यांना अवघ्या सहाच जागा मिळाल्या आहेत. मविआकडे स्पष्ट बहुमत असल्यामुळे आता सभापती पदासाठी मविआमध्ये रस्सीखेच सुरु झाली आहे. सध्या सभापती पदासाठी लकी अण्णा टेलर, सुनिल महाजन, श्यामकांत सोनवणे यांची नावे आघाडीवर आहेत.

जळगाव कृउबा निवडणुकीत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पॅनलचा माजी पालकमंत्री आहे. गुलाबराव देवकर यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने धुव्वा उडविला. तब्बल २७ वर्षांनंतर बाजार समितीमध्ये सत्तांतर झाले आहे. निकाल जाहीर होवून आता आठवडा उलटला आहे. त्यामुळे सभापती पदासाठी महाविकास आघाडीमध्ये खलबते सुरु झाली आहेत. सभापतीपदासाठी माजी सभापती लकी टेलर, मनपाचे विरोधी पक्षनेता सुनिल महाजन, जिल्हा बँकेचे संचालक असलेले श्यामकांत सोनवणे या तीन जणांची नावे आघाडीवर आहेत. कृषि उत्पन्न बाजार समितीसाठी ग्रामीण चेहराच सभापतीपदासाठी दिला जाईल असे देखील सांगण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.